बॉलिवूडमध्ये दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीला एक अशी अभिनेत्री म्हणून लक्षात ठेवले जाते की जिने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि अदांनी सर्वांनाच घायाळ केले होते. २५ फेब्रुवारी १९७४ मध्ये मुंबईत दिव्याचा जन्म झाला. साधारणतः १९९० मध्ये दिव्याने तिच्या सिनेकरिअरची सुरुवात ‘बोबली राजा’ या तेलगु सिनेमाने केली.
२ वर्षांनी तिने आपली नजर बॉलिवूडकडे वळवली. १९९२ मध्ये तिचा ‘विश्वात्मा’ हा पहिला हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातले ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी’ हे गाणे फार प्रसिद्ध झाले होते. हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.
१९९२ मध्ये दिव्याचा ‘शोला और शबनम’, ‘दिल का क्या कसूर दीवाना’, ‘बलवान’, ‘दिल आश्ना है’ यांसारखे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘दीवाना’ या सिनेमासाठी दिव्याला फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. १९९२ ते १९९३ या एका वर्षात दिव्याने १४ हिंदी सिनेमांत काम केले. एखाद्या नवोदित कलाकाराने पदार्पणाच्याच वर्षी १४ सिनेमात काम करण्याचा रेकॉर्ड आजही दिव्या भारतीच्याच नावावर आहे.
‘शोला और शबनम’ या सिनेमाच्या सेटवर फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला गोविंदाला भेटायला गेले होते. तेव्हा त्यांची ओळख दिव्या भारतीशी झाली. त्यानंतर दिव्या १९९२ मध्ये साजिद नाडियाडवालासोबत विवाह बंधनात अडकली. तेव्हा दिव्या भारती केवळ १८ वर्षांची होती. पण लग्नाच्या केवळ एक वर्षांनंतर ५ एप्रिल १९९३ मध्ये दिव्याचा राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर तिचे ‘रंग’ आणि ‘शतरंज’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘रंग’ हा सिनेमा तेव्हाच्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमा ठरला होता.