दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबू याचा आज ४८ वा वाढदिवस आहे. महेश बाबूचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ मध्ये चेन्नई येथे झाला. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. महेश बाबूला ‘प्रिन्स ऑफ टॉलीवूड’ असेही म्हटले जाते. अभिनय क्षेत्राप्रमाणे त्याचे वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत असते. त्याच्या वाढदिवसानिमित्त महेश बाबू आणि बॉलीवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची फिल्मी लव्हस्टोरी जाणून घेऊया…
हेही वाचा : “दिग्पालने माझ्या नकळत त्यांना…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितला सून आणि लेकासह एकत्र काम करण्याचा अनुभव
१९९३ मध्ये नम्रता शिरोडकरने ‘मिस इंडिया फेमिना’ हा खिताब जिंकला होता. यानंतर तिने ‘जब प्यार किसी से होता है’या बॉलीवूड चित्रपटात काम केले. चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर नम्रताने दाक्षिणात्य चित्रपट ‘वामसी’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाच्या सेटवर महेश बाबू आणि नम्रता यांची पहिल्यांदा भेट झाली त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याने प्रेमाची कबुली नम्रतासमोर दिली.
हेही वाचा : “तू या जन्मात…”; बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं इमरान हाश्मीची उडवली खिल्ली; म्हणाला…
चार वर्ष एकमेकांना गुपचूप डेट केल्यावर महेश आणि नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केले. लग्नानंतर नम्रता चित्रपटसृष्टीपासून दूर गेली परंतु महेश बाबू साऊथचा सुपरस्टार झाला. नम्रताबद्दल महेश बाबूने सर्वप्रथम आपल्या बहिणीला सांगितले होते. बहिणीशिवाय घरातील इतर कोणत्याच सदस्याला त्याने या नात्याबद्दल सांगितले नव्हते. या दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.
हेही वाचा : ‘कोई मिल गया’तील रोहीतप्रमाणेच हृतिक रोशनबरोबर घडली होती ‘ती’ घटना अभिनेत्याने सांगितला किस्सा
दरम्यान, नम्रता ही महेश बाबूपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. आज या जोडप्याला दोन मुलं असून त्यांची नावं गौतम आणि सितारा अशी आहेत. आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या महेश बाबूने आतापर्यंत आठ नंदी पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार, चार आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एका आयफा पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.