इंडो-कॅनेडियन अभिनेत्री सनी आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. सनीला पोर्न स्टार इमेजमुळे जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. अलीकडेच रिलीज झालेला ‘रागिनी एमएमएस 2’ हा सिनेमासुद्धा हिट ठरल्यामुळे बी टाऊनमध्ये सनीकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत.
फोटो गॅलरीः हॅपी बर्थ़डे सनी लिओनी
भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनीचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला. सनीने वयाच्या १९व्या वर्षी अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. सनीच्या आईवडिलांना तिच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता, मात्र नंतर त्यांनी तिचे हे करिअर स्वीकारले. कॅथलिक शाळेत शिकलेल्या सनीने वयाच्या ११ व्या वर्षी पहिला किस केला होता, तर वयाच्या केवळ १६ व्या वर्षी एका बास्केटबॉल खेळाडूसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. अॅडल्ट स्टार बनण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरीत काम करायची. याशिवाय तिने काही काळ टॅक्स अँड रिटार्यमेंट फर्ममध्येही काम केले. पोर्न इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी सनी पीडियाट्रिक नर्सिंगचे (बाल चिकित्सा) शिक्षण घेत होते. सनीला पराठे आणि इटॅलियन फूड आवडते.