दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय देवरकोंडाने ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘विजय’ आज यशाच्या शिखरावर जरी असला, तरी एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे राहत्या घराचे भाडे देण्याएवढेही पैसे नव्हते. विजय देवरकोंडाच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “शाहरुख-सलमान असो किंवा आमिर जेव्हा त्यांच्याकडे…” नवाजुद्दिनने सांगितला सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव

विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी हैदराबादमध्ये झाला. तेलुगू कुटुंबात जन्मलेले विजयचे वडील ‘देवरकोंडा गोवर्धन राव’ हे दक्षिण भारतीय टीव्ही स्टार होते, असे असूनही विजयला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तो लहानपणापासूनच खूप स्पष्टवक्ता होता, त्यामुळेच विजयचे सर्व कुटुंबीय त्याला ‘राउडी’ या नावाने हाक मारतात.

विजय देवरकोंडाने २०११ मध्ये ‘नुव्विला’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “करिअरच्या सुरुवातीच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण व्हायची की, राहत्या घराचे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते, पण मी जीवनात कधीही हार मानली नाही.”

हेही वाचा : Artificial Intelligence ‘शाप की वरदान?’ ए. आर. रेहमान चिंता व्यक्त करीत म्हणाले, “मला नव्या पिढीची…”

‘नुव्विला’ नंतर विजय देवरकोंडाने ‘डियर कॉम्रेड’, ‘मेहनती’ आणि ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटाचा हिंदीतही रिमेक करून ‘कबीर सिंग’ चित्रपट बनवला गेला. विजयने ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. अभिनयासोबतच विजय देवरकोंडा हा चित्रपट निर्माता असून ‘हिल एंटरटेनमेंट’ असे त्याच्या कंपनीचे नाव आहे. याशिवाय ‘राउडी वेअर’ नावाचा त्याचा कपड्यांचा ब्रॅण्डही आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday special vijay deverkonda recalls his struggle days sva 00