आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे.आशा भोसले यांना संगीताचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. वडील दिनानाथ मंगेशकर आणि बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायिकेच्या रुपात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितिक कारकीर्दीला सुरुवात झाली.
आशा भोसले त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे देखईल चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. अवघ्या १७ वर्षांच्या असताना आशा भोसलेंनी वयाने १६ वर्ष मोठ्या असलेल्या गणपत राव भोसले यांच्याशी लग्न केलं होतं. गणपतराव भोसले हे लता दीदींचे सेक्रेटरी होते. या लग्नामुळे लता दीदी आशा भोसलेंवर नाराज झाल्या होत्या. काही काळ त्या आशा भोसले यांच्याशी बोलत नव्हत्या. माज्ञ ११ वर्षांनंतर आशा भोसले आणि गणपतराव विभक्त झाले. यावेळी आशा भोसले यांना तीन मुलं होती.
त्यानंतर आशा भोसलेंनी एकट्यांनी मुलांचा सांभाळ केला. करिअरमध्ये देखील त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली होती. रेकॉर्डिंगच्या निमित्ताने त्यांची ओळख आरडी बर्मन यांच्याशी झाली. दोघांनी बरचं काम एकत्र केलं आहे. पंचमदा देखील त्यांच्या रोमॅण्टिक गाण्यांसोबत खासगी जीवनातही पंचम दा चांगलेच रोमॅण्टिंक होते. पहिल्या पत्नीलापासून विभक्त झाल्यानंतर बर्मन यांना आशा भोसले आवडू लागल्या होत्या. एवढचं नव्हे तर एके दिवशी त्यांनी आशा भोसलेंना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आशा भोसले या आरडी बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या. मात्र तरिही बर्मन यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. पहिल्यांदा आशा भोसले यांनी बर्मन यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मात्र बर्मन यांनी हार मानली नाही.
लग्नात आल्या अडचणी
आरडी बर्मन हे आशा भोसले यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. अखेर त्यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी तयार केलंचं आणि दोघांनी लग्न गाठ बांधली. दोघांचं ही हे दुसरं लग्न होतं. असं असलं तरी लग्नाआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आशा भोसले बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांचं कुटुंब होतं. तर आर डी बर्मन यांच्या आईचा या लग्नाला विरोध होता.
दरम्यानच्या काळात आर डी बर्मन यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्याने बर्मन यांना मोठा धक्का बसला. तर त्यांच्या आई मीरा यांना तर पतिच्या निधनामुळे मानसिक समस्यांचा सामना करावा लागला. बर्मन यांच्या आईंची स्मरणशक्ती गेली. स्वत:च्या मुलालादेखील त्या ओळखत नव्हत्या. त्यांनी काही वेळ वाट पाहिली. मात्र आईच्या तब्येत काही सुधारणार नाही अशी चिव्ह दिसू लागल्याने त्यांनी अखेर आशा भोसले यांच्याशी लग्न केलं. यावेळी आशा भोसले ४७ वर्षांच्या होत्या तर आरडी बर्मन ४१ वर्षांचे होते.
शाद, ओ.पी. नय्यर, खैय्याम, रवी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, शंकर-जयकीशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, इलियाराजा, ए.आर. रेहमान आणि अशा इतरही संगीतकारांसह आशा भोसले यांनी काम केले आहे. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, पंजाबी, तमिळ, उर्दू, बंगाली अशा विविध भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.