शूजीत सरकार दिग्दर्शित आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘मद्रास कॅफे’ वादाच्या भोव-यात सापडला आहे. ‘मद्रास कॅफे’च्या मुंबईतील प्रदर्शनाला भाजप पक्षाने विरोध दर्शविला आहे. तसेच, काही तामिळ संघटनांनी चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, जॉनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात एलटीटीईचे प्रमुख व्ही.प्रभाकरन यांची नकारात्मक बाजू दाखविण्यात आली आहे. चित्रपटात एलटीटीईचा अतिरेकी संघटना असा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपसह ब-याच संस्थांनी चित्रपट विरोधी नोंद केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे काही तमिळ लोक मुंबईत राहतात. त्यामुळे ‘मद्रास कॅफे’ला मुंबईत प्रदर्शित करण्याची परवानगी दिल्यास येथे सामाजिक मतभेद निर्माण होईल.  चित्रपट मुंबईत प्रदर्शन थांबवण्यास जर राज्य सरकार अयशस्वी झाले तर भाजप कामगार चित्रपटगृहांबाहेर निषेध करतील, असेही शेलार म्हणाले.
श्रीलंकेतली अंतर्गत बंडाळी आणि त्यात भारताची भूमिका यावर हा चित्रपट आधारित आहे. येत्या २३ ऑगस्टला ‘मद्रास कॅफे’ संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा