भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं गोव्यामध्ये निधन झालं. त्यानंतर सोनाली फोगट यांच्या मृत्यु प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना फोगट यांच्या मृत्यूआधीच्या काही तासांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल झाला. आता फोगट यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – Video : “दारूच्या नशेमध्ये आहेस का?” मध्यरात्री पार्टीमधून बाहेर पडताच निक्की तांबोळीला चालणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

याआधी व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांना व्यवस्थित चालता येत नसल्याचं दिसत होतं. तसेच त्या आरोपी सुधीर सांगवानचा आधार घेऊन चालत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. आता या नव्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

क्लबमध्ये पार्टी सुरु असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सुधीर सांगवान सोनाली यांना काहीतरी पेय बळजबरीने देत असल्याचं दिसत आहे. क्लबमधील हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ गोव्यामधीलच आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही सुधीर सांगवान असल्याचं दिसत आहे. निधनापूर्वी सोनाली यांनी आपल्या साथीदारांसह अंजुना बीचवरील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

त्यानंतर तिघंही येथून बाहेर पडले होते. सोनाली फोगट यांना चालता येत नव्हतं. त्या आरोपी सुधीर सांगवानची मदत घेत चालत होत्या. त्यांची शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं. या घटनाक्रमानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली फोगट यांना गोव्यातील सेंट अँथनी रूग्णालयामध्ये मृतावस्थेत दाखल करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली. पण फोगट यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली.

Story img Loader