मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतंच उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी पुन्हा उर्फीवर टीका केली आहे. काल त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्यानंतर आज त्यांनी पुन्हा टीका केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, “उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसात तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी.”असा आक्रमक इशारादेखील चित्रा वाघ यांनी दिला
आणखी वाचा : “प्रभाससमोर हृतिक रोशन…” एसएस राजामौली यांचं जुनं वक्तव्य चर्चेत, नेटकरी म्हणाले…
उर्फीने केलेल्या ट्वीटचा संदर्भ देत चित्रा वाघ म्हणाल्या, “तिने ज्या भाषेत ट्वीट केलंय ते सांगतानाही मला लाज वाटते आहे. मी स्वतः पोलिसांत केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. आज ट्वीट केलंय तिने, पण उद्या मला जर कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन आणि मग ट्वीट करेन. काय व्हायचं असेल ते होऊद्या, पण आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही. सगळ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो म्हणून कुणीही नाममात्र कपडे घालून रस्त्यावर फिरायचं. असले चाळे आम्ही चालू देणार नाही.”
सार्वजनिक ठिकाणी असे उघडे नागडे फिराल तर त्याचा प्रसाद तुम्हाला मिळेलच असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा यांच्या तक्रारीवर उर्फीने उत्तर दिलं होतं. यामुळेच हे प्रकरण आता आणखी चिघळलं आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस नेमकी काय ठोस पावलं उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.