झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली असताना त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारतो की “तुम्हाला किचनमध्ये जाऊन काही बनवायला आवडतं का?” यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस बोलतात, की “मला अनेक गोष्टी बनवायला आवडतात. अलीकडेच्या काळात किचनमध्ये जाणं होतं नाही. पण माझा हा दावा आहे की जगातला सर्वात उत्तम चहा मला बनवता येतो डोसा, पोहे, अंडा करी, ऑमलेट असे अनेक पदार्थ मला चांगले बनवता येतात.”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : पाकिस्तानी गायकाने दुबईत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून नेटकरी करतायत स्तुती

यावर संकर्षण अमृता फडणवीस यांना विचारतो की, “ते म्हणाले त्यांना चहा, पोहे, डोसा, अंडा करी, ऑमलेट चांगलं बनवता येतं, तर तुम्हाला त्यांच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो?” यावर उत्तर देत अमृता बोलतात की “मला त्यांच्या हातचा डोसा प्रचंड आवडतो. एकदम क्रिस्प डोसा, त्याच्यासोबत बटाटाच्या भाजी आणि सांबारपण अप्रतिम बनवतात. तर आधी दरवेळी जेव्हा आमची बाई यायची नाही तेव्हा मी देवेंद्रजींकडून डोसा बनवून घ्यायचे.”

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

पुढे संकर्षण म्हणाला, “मला एक सेकंद असं वाटलं, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होते. वहिनी आता म्हणाल्या की बाई यायची नाही तेव्हा त्यांच्या हातून मी करुन घ्यायच्या. ही दोन किती वेगळीच वाक्य आहेत ऐकायला.”

आणखी वाचा : पवन कल्याण अल्लू अर्जूनपेक्षा मोठा अभिनेता असल्याचं सिद्ध करण्याची हीच वेळ, राम गोपाल वर्मांचं ट्वीट चर्चेत

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर हे कलाकार देखील सहभागी होणार आहेत. आता ‘किचन कल्लाकार’ या शोच्या आगामी भागामध्ये अमृता फडणवीस यांना पदार्थ करण्याचे चॅलेंज मिळणार? त्या जिंकणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी भागामध्ये मिळणार आहेत.