भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सतत चर्चेत राहणाऱ्या व्यक्तींपैकी पंकजा मुंडे यादेखील एक आहेत. पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. अभिनेता सुबोध भावे सुत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आता पंकजा चक्क एका पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
आणखी वाचा – “तू आमच्यात असशील…” सोनाली कुलकर्णीच्या आवडत्या व्यक्तीचं निधन, शेअर केला भावुक व्हिडीओ
झी मराठी वाहिनीवर ‘उंच माझा झोका’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याद्वारे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या स्त्रियांचा सन्मान केला जातो. या वर्षीदेखील अशा स्त्रियांचा झी मराठी वाहिनी सन्मान करणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन पंकजा मुंडे करणार आहेत. तसेच त्याच्यांबरोबर अभिनेत्री क्रांती रेडकर या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन करताना दिसेल.
पाहा व्हिडीओ
झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या पुरस्कार सोहळ्याचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये पंकजा आणि क्रांती सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. शिवाय बहुदा पंकजा या पहिल्यांदाच एखाद्या पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन करत आहेत.
आणखी वाचा – “अंगप्रदर्शन करण्याची गरज काय?” अंतर्वस्त्र परिधान न करता फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल
या व्हिडीओमध्ये क्रांती म्हणते, “यांचं इथे भाषण असेल कदाचित.” यावर पंकजा म्हणतात, “नाही मी देखील तुझ्यावर इथे निवेदनच करणार आहे. हा महिलांचा कार्यक्रम म्हणून मला इथे येण्याचा मोह आवरला नाही.” येत्या २८ ऑगस्टला रविवारी संध्याकाळी ७ वाजता हा पुरस्कार सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.