बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सध्या त्याच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रक्षाबंधनच्या दिवशी गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटावर अनेक चित्रपट समीक्षकांनी तसेच कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटवर अक्षय कुमारनेही कमेंट केली आहे.
“माझ्या वडिलांनी मला…” आमदार फोडाफोडीच्या राजकारणावर पंकजा मुंडेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
पंकजा मुंडे यांनी नुकतंच रक्षाबंधन चित्रपटाच्या निमित्ताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी रक्षाबंधन चित्रपट पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया दिली आहे. “आज रक्षाबंधन…, मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षा बंधन”सिनेमा पाहीला. मला खूप भावला. समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत कारण त्यांची किम्मत मोजावी लागते. fridge,TV,गाड़ी, status या गोष्टींसाठी आपल्या लाडकीचे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे!”
“मला वाटते रक्षाबंधन सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे. कठीण आहे, आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो. नाते फायदा-तोटा यात बसवत असतो. जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा, काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची ! फारच चांगला चित्रपट. फारच चांगला संदेश…अक्षय कुमार सर”, असे पंकजा मुंडेंनी ट्वीट करत म्हटले आहे.
पंकजा मुंडेंच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे रक्षाबंधन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारनेही पंकजा मुंडेंच्या या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना अक्षय कुमारने पंकजा मुंडेंचे आभार मानले आहे.
“धन्यवाद पंकजा जी, जरी आम्ही या चित्रपटाद्वारे 5% बदल घडवून आणू शकलो तरीही हा आमच्यासाठी मोठा विजय असेल”, असे अक्षय कुमारने कमेंट करत म्हटलं आहे.
वडील गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, म्हणाल्या “त्यांनी आम्हाला…”
दरम्यान अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता अक्षय हा जॉली एलएलबीसह राम सेतू, बडे मियाँ छोटे मियाँ, ओह माय गॉड २ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांना लोक कसा प्रतिसाद देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.