Sonali Phogat Death Case : टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या भावाने केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर फोगट मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> “माझ्या बहिणीची हत्या झाली, पण पोलीस…”; सोनाली फोगट यांच्या भावाची गोव्यात तक्रार, पंतप्रधानांकडे न्यायाची मागणी करणार
भाऊ रिंकू ढाका यांनी सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. यामागे सोनाली फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप ढाका यांनी केला आहे. फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करण्यास परवानगी देणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यानंतर आता गोवा पोलिसांनी दोन जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>> १५ दिवसांनंतर शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तव यांनी पत्नीला पाहताच उच्चारले ‘ते’ चार शब्द, प्रकृतीत सुधारणा
दरम्यान, सोनाली फोगट २३ ऑगस्ट रोजी गोव्यात मृत्यू झाला. प्राथमिक तपासाअंती सोनाली २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या आणि त्या अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनाली यांच्या भावाप्रमाणेच त्यांच्या भाच्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सोनाली फोगट यांचा लॅपटॉप आणि इतर साहित्य खोलीतून गायब असल्याचं म्हटलं होतं.