भारतीय जनता पार्टीचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. तेजस्वी सूर्या लवकरच शिवश्री स्कंदप्रसादशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेजस्वी हे दक्षिण बेंगळुरूचे खासदार आणि बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. तर शिवश्री ही लोकप्रिय गायिका व भरतनाट्यम नृत्यांगना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द फेडरलने दिलेल्या वृत्तानुसार, ३४ वर्षीय तेजस्वी सूर्या व शिवश्री स्कंदप्रसाद यांचे लग्न ४ मार्च २०२५ रोजी बंगळुरू होणार आहे. लग्नाची तयारी सुरू आहे, अशी माहिती समोर येत आहे. लग्नाच्या चर्चा होत असल्या तरी तेजस्वी सूर्या किंवा शिवश्री यांच्यापैकी कुणीही याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा – ३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप

तेजस्वी सूर्या हे भाजपाचे ‘फायर ब्रँड’ नेते आहेत. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९० रोजी कर्नाटक येथील चिकमंगळूर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी आणि आई शिक्षिका आहे. तेजस्वी यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण बेंगळुरूमध्ये पूर्ण केले आणि नंतर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली. अभाविपमधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते पहिल्यांदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते, २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले.

हेही वाचा – ‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….

कोण आहे शिवश्री स्कंदप्रकसाद?

शिवश्री स्कंदप्रसादने बायोइंजिनियरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए आणि मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये एमए पूर्ण केले आहे. शिवश्रीला संगीतक्षेत्रात खूप रस आहे. तिने आतापर्यंत देशभरातील अनके प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये खासकरून चेन्नईमध्ये सादरीकरण केले आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या कन्नड भक्ती गीत ‘पूजीसलेंडे हुगला थंडे’चं कौतुक केलं होतं. सध्या शिवश्रीचे युट्यूबवर दोन लाख सबस्क्रायबर्स आहे. तिने कन्नड भाषेतील ‘पोन्नियिन सेल्वन: भाग 2’ मधील ‘वीरा राजा वीरा’ गाणं गायलं होतं. हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं.