ऋतूराज मोशन पिक्चर्स निर्मित ‘ब्लॅकबोर्ड’ काल १९ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.’ब्लॅकबोर्ड’ सध्याच्या भोंगळ शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतो. या चित्रपटात पालकांच्या संघर्षाचं चित्रण करण्यात आलं आहे.
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली पालकांची दमछाक, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेशी लढणाऱ्या सामान्य पालकाची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अरूण नलावडे आणि माधवी जुवेकर यांची मध्यवर्ती भूमिका असून सुनील होळकर, सायली देवधर, राजेश भोसले, वृषाली हटाळकर आणि इतर कलावंत आहेत. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची छटा दाखवणारी बाल कलावंत मृण्मयी सुपल ब्लॅकबोर्ड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘ब्लॅकबोर्ड’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिनेश देवळेकर यांनी केले असून संदीप राव आणि जगदीश राव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जावेद अहतीशाम यांनी तर संकलन सनिल कोकाटे यांनी केले आहे. चित्रपटासाठी गीतरचना व संगीत संदीप पाटील यांनी दिले आहे.
‘ब्लॅकबोर्ड’ चित्रपटगृहात दाखल
ऋतूराज मोशन पिक्चर्स निर्मित ‘ब्लॅकबोर्ड’ काल १९ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.'ब्लॅकबोर्ड' सध्याच्या भोंगळ शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतो.
आणखी वाचा
First published on: 20-06-2015 at 12:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blackboard movie releasing on 19 june