ऋतूराज मोशन पिक्चर्स निर्मित ‘ब्लॅकबोर्ड’ काल १९ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.’ब्लॅकबोर्ड’ सध्याच्या भोंगळ शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतो. या चित्रपटात पालकांच्या संघर्षाचं चित्रण करण्यात आलं आहे.
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली पालकांची दमछाक, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेशी लढणाऱ्या सामान्य पालकाची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अरूण नलावडे आणि माधवी जुवेकर यांची मध्यवर्ती भूमिका असून सुनील होळकर, सायली देवधर, राजेश भोसले, वृषाली हटाळकर आणि इतर कलावंत आहेत. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची छटा दाखवणारी बाल कलावंत मृण्मयी सुपल ब्लॅकबोर्ड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘ब्लॅकबोर्ड’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिनेश देवळेकर यांनी केले असून संदीप राव आणि जगदीश राव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जावेद अहतीशाम यांनी तर संकलन सनिल कोकाटे यांनी केले आहे. चित्रपटासाठी गीतरचना व संगीत संदीप पाटील यांनी दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा