जग्गा जासूसमधील काही प्रणय दृश्यातील सहजता अन्य काही दृश्यात हरवल्यासारखी दिसली रे दिसली की त्यावरून स्पष्ट निष्कर्ष कोणता निघेल? अर्थातच रणबीर कपूर व कतरिना कैफच्या बदलत्या नातेसंबंधाचा हा थेट दृश्य परिणाम आहे. हे काही पहिल्यांदाच घडतंय असे नाहीच व व्यक्तिगत गोष्टींचा व्यावसायिक कामावर परिणाम होऊ द्यायचा नसतो, असे कितीही म्हटलं तरी हे असे काही होतच राहणार. ‘मुगल ए आझम’ निर्मितीवस्थेत असतानाच दिलीप कुमार व मधुबाला यांचा ब्रेकअप झाल्याने इतक्या मोठ्या चित्रपटाचे काय असा प्रश्न उपस्थित झालाच. तेव्हा दिग्दर्शक के. असिफ यांनी ही परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने चित्रपट पूर्ण होऊ शकल्याची आजही चर्चा होते. दिलीप कुमार व मधुबाला फक्त कॅमेरासमोर अभिनयापुरते बोलत व एकदा का दृश्य ओके झाले की आपण एकमेकांना फारसे ओळखत नाही अशाच थाटात वावरत अशा कथा दंतकथा सांगितल्या जातात. संजीवकुमार व हेमा मालिनीमधील वादाचा मात्र ‘धूप छाँव’ पूर्ण करण्यावर बराच परिणाम झाला. संजीवकुमारच्या एकतर्फी व असफल प्रेम प्रकरणातील हे एक. हेमा मालिनीला हे काहीच आवडत नव्हते. गॉसिप्सवाल्याना अशा खेळात वाट्टेल तशी भर टाकायची जणू झक्कास संधी मिळते. आणि त्यात सत्य कोठेतरी हरवत जाते. हेमा मालिनीने तारखा देण्यात टाळाटाळ सुरु केली आणि चित्रपट पूर्ण होणे लांबले. एखादी व्यक्ती काही कारणास्तव आवडेनाशी झाल्यावर तिच्यासोबत व्यावसायिक स्तरावरही काम करावेसे वाटत नाही ते हे असे. प्रत्यक्ष प्रेम अथवा छान मैत्री असणारे कलाकार वारंवार एकत्र येणे स्वाभाविक असते. एकमेकांना स्वभाव व सहवास याची सवय झालेली असते. सेटवर वातावरणही छान खेळकर राहते. चित्रपट कधी व कसा पूर्ण होतो तेही कळत नाही. सर्वाधिक फायदा प्रणय दृश्याना होतो. शरीर भाषेत सहजता असते. स्पर्शात कोरडेपण नसते. रिटेकचीही तयारी असते व प्रेक्षकांनाही अशा खऱ्या प्रेमाचा मोरंबा अथवा लोणचे पडदाभर पाहायला आवडते. ऋषी कपूर व नीतू सिंग जोडीवर रसिकांची एक पिढी उगाच फिदा झाली नाही. रणवीर सिंह व दीपिका पदुकोणची प्रणय दृश्य उगाच अस्सल वाटत नाहीत. पण अशा जमलेल्या जोड्या चित्रपट पूर्णतेच्या प्रवासात मधेच तुटणे म्हणजे चित्रपटाचा पूर्णपणे लोच्या. प्रेक्षकांनाही असे प्रत्यक्षात दुरावलेले प्रियकर पडद्यावर एकत्र पाहण्यास रस कितपत राहिल याची सतत शंका कायम राहते. आता तर चित्रपटाचे प्रमोशन प्रसार माध्यमातून खुलत फुलत असतानाच्या काळात या घडामोडींवर प्रश्नाचा रोख राहतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ह्रतिक रोशन व कंगना राणावत संबंधाची गोष्ट त्यांचे नाते तुटल्यावर ‘फोकस’मधे आली. कंगनाने बेछूट भाष्य करीत व काही खासगी गोष्टी बाहेर काढत आपली बाजू कशी बरोबर आहे हे अधोरेखित ठेवले. पण ह्रतिक काहीही व कुठेही बोलला नाही. पण मीडियाने हे विसरावे का? ‘मोहंदो जोडो’च्या फर्स्ट लूकच्या वेळेस मीडिया नेमक्या याच मुद्द्यावरुन ह्रतिकला बोलते करण्याचा प्रयत्न करु लागली. तो फार काही बोलला नाही. जग्गा जासूसच्या प्रसिद्धीत मात्र रणबीर व कॅटला आपले नेमके कशावरून बिनसले याचेच सतत उत्तर द्यावे लागेल नि त्याच गोष्टींना कव्हरेज मिळत राहिलंस वाटते. स्टारच्या प्रेमाचा लोच्या हा असे नवे गोंधळ निर्माण करतो. अजय देवगण व करिश्मा कपूर यांचेही काही काळ सॉलिड सूत जमले होते. अशा वेळेस निर्मात्याचे गणित असते ही जोडी करारबद्ध करणे फायद्याचे. एकमेकांच्या ओढीने दोघेही वेळेवर सेटवर येतील वगैरे वगैरे अशा अपेक्षा सुरु होते. निर्माता नीतिन मनमोहनने त्यानुसारच अजय व करिश्माला साईन केले. पण चित्रपटाचा मुहूर्त होईपर्यंत त्यांचे बिनसले व तो बचावला. ते दोघे मुहूर्ताच्या वेळेसच एकमेकांकडे पाहत नाहीत याचीच बातमी झाली व यालाच धोक्याचा सिग्नल मानत निर्मात्याने हा चित्रपटच बंद केला. समजा सहा आठ रिळांच्या चित्रीकरणानंतर हे त्या दोघांच्या तुटीचे प्रकरण घडले असते तर? एक तर ते दोघे फारसे एकत्र येणार नाहीत असेच पटकथेत फेरफार करा अथवा दोघांमधील नाते तुटल्याचा तणाव सेटवर सहन करीत काम करा हे करावे लागले असते. फार जिकरीचे होऊन जाते हे सगळेच! चित्रपट पूर्ण होईपर्यंत तरी प्रमुख नायक नायिकेच्या अस्सल प्रेम नात्यात विघ्न येऊ नये अशी निर्माता प्रार्थना करु शकतो तरीही त्यांचा ब्रेकअप झाल्यावर पहिल्यांदा निर्माता कातावतो. कारण त्याचा चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीपासून वितरकापर्यंत कसाही परिणाम होत जातो. एकादा ‘मुगल ए आझम’ अपवाद. पण ‘जग्गा जासूस’कडे पाहताना ब्रेक-अपवाल्या जोडीचा चित्रपट याच दृष्टिकोनातूनच पाहतोय ना? आज मीडिया वेगवान व एखाद्या गोष्टीचा सतत पाठपुरावा करणारा आहे. रणबीर व कॅटचे जमले कसे, फाटले कसे हे खुद्द त्यांच्याकडूनच स्पष्ट होण्याची संधी तर केवढी मोठी. अरेरे वेगळे तर झालात पण नवीन गोष्टीना संधी दिलीत. नशीब चित्रपट पूर्ण होऊ शकलाय…. अन्यथा एका असफल प्रेमाने एका चित्रपटाचा मध्येच बळी घेतला असे झाले असते.
दिलीप ठाकूर