सध्या वेबसीरिजचा जमाना आहे. बॉलिवूडमधील बरीच मंडळी या नव्या माध्यमाकडे वळली आहेत. इतकंच नव्हे तर नवनवीन विषयावर आधारित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेबसीरिजच्या रुपामध्ये उत्तम कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळताहेत. तसेच कलाकारांना विविध भूमिकेमध्ये पाहणंही प्रेक्षकांना आवडत आहे. म्हणूनच की काय सैफ अली खान, राधिका आपटे सारख्या कलाकारांनी डिजिटल विश्वात पदार्पण केलं. बॉबी देओलची तर ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. या वेबसीरिजचे दोन भाग सुपरहिट ठरल्यानंतर तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. आता याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

‘आश्रम ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉबीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फक्त तीन हा आकडा दिसत आहे. आणि आगीने पेटलेलं वातावरण यामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच ‘आश्रम’ मधील बॉबीची सहकलाकार ईशा गुप्ताने देखील हाच व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – १०० दिवसांनी रुग्णालयातून घरी परतली लेक, प्रियांका चोप्रा मात्र शूटिंगमध्ये झाली व्यस्त, पाहा फोटो

‘आश्रम ३’ कधी प्रदर्शित होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचं आणि डबिंगचं काम पूर्ण झालं असल्याचं बोललं जात आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजने बॉबीच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही. बॉबीने यामध्ये साकारलेली बाबा निराला ही भूमिका प्रचंड गाजली. राजकारण, ड्रग्स प्रकरण या सगळ्या विषयांमध्ये गुंतलेली ही वेबसीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.

आणखी वाचा – “…तर चित्रपट किती कोटी कमावतो याला अधिक महत्त्व” प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान

बॉबी बऱ्याच काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर होता. त्याच्याकडे फारसे चित्रपट किंवा इतर कोणतेच प्रोजेक्ट नव्हते. पण ‘आश्रम’ मधून कलाकार म्हणून आपण उत्तम आहोतच हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. या वेबसीरिज व्यतिरिक्त तो ‘एनिमल’ या हिंदी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर, रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

Story img Loader