बॉबी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘गुप्त’ प्रदर्शित होऊन २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात बॉबी देओलसोबतच अभिनेत्री काजोल आणि मनिषा कोईराला यांच्याही मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. एवढंच नाही तर चित्रपटाची गाणी देखील सुपरहिट झाली होती. आता या चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अभिनेता बॉबी देओलनं शूटिंगच्या वेळी घडलेले भन्नाट किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुप्त’ चित्रपटातील ‘दुनिया हसिनों का मेला’ हे गाणं त्यावेळी जेवढं लोकप्रिय ठरलं होतं तेवढंच ते आजही लोकप्रिय आहे. आजही प्रेक्षकांना या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता येत नाही. या गाण्यासाठी बॉबी देओलनं ऑल ब्लॅक लुकमध्ये डिस्को डान्स केला होता. पण यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलनं या गाण्याच्या रिहर्सलचा एक मजेदार किस्सा शेअर केला आणि यासोबतच या गाण्यासाठी त्याला किती मेहनत घ्यावी लागली हे देखील सांगितलं.

आणखी वाचा- “आपल्याच गावी जाऊ शकत नसल्याचं दुःख…” उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

बॉबी म्हणाला, “हा माझा सर्वाधिक हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आणि विजू शाह यांचा आतापर्यंत सर्वोत्तम चित्रपट ठरला होता. जीवन राय यांच्यासोबतही मला या चित्रपटानंतर काम करण्याची इच्छा होती. पण काही कारणानं त्यांना देश सोडावा लागला. पण मला आठवतंय आम्ही लोकप्रिय गाणं ‘दुनिया हसिनों का मेला’चं शूट करत होतो. आम्ही या गाण्याचं शूटिंग महबूब स्टुडियोमध्ये केलं आहे.”

आणखी वाचा- Aashram 3 मध्ये बॉबी देओलसोबत बोल्ड सीन, ईशा गुप्ताने सांगितला शूटिंगचा अनुभव

या गाण्याबद्दल बोलाताना बॉबी पुढे म्हणाला, “मी त्यावेळी चिन्नी प्रकाश यांच्यासोबत डान्स करायचो आणि माझी अवस्था त्यावेळी खूपच विचित्र असायची. मी त्या गाण्यासाठी एवढी रिहर्सल करत असे की घामाने अक्षरशः माझी पँट भिजायची. असं वाटायचं की पँटवर कोणी पाणी ओतलं आहे. पण मला या चित्रपटासाठी आणि या गाण्यासाठी स्वतःचे १०० टक्के प्रयत्न करायचे होते. हे गाणं माझ्यासाठी खास होतं. ज्यादिवशी हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा सगळ्या चॅनेलवर फक्त एकच गाणं सुरू होतं.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby deol recall memories of his blockbuster film gupt with kajol mrj