नेटफ्लिक्सवरील बहुप्रितिक्षित वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’च्या पाचव्य़ा सिझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी ३ सप्टेंबरला ही बेव सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे बिंज वॉचसाठी या विकेण्डला प्रेक्षकांसाठी चांगला पर्याय आहे. या सिझनमध्ये अनेक जुने कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर काही नव्या चेहऱ्यांनी प्रेक्षकाचं लक्ष वेधलं.
या सिझनमध्ये काही असे कलाकार आहे जे क्रिकेटर विराट कोहली आणि बॉबी देओल सारखे दिसत असल्याने भारतातील प्रेक्षकांनी सोशल मीडियावर धमाल मीम्स व्हायरल करायला सुरुवात केली आहे. ‘मनी हाइस्ट’चे चाहते सोशल मीडियावर सध्या मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. यात खास करून विराट कोहली आणि बॉबी देओल सारख्या दिसणाऱ्यां कलाकारांचे मीम्स व्हायरल होत आहेत.
Bobby Deol’s Cameo in #MoneyHeistSeason5 pic.twitter.com/DcFj1JY63d
— (@aakash_lakhia) September 3, 2021
या शोमधील ऑफिसर विराट कोहली आणि बॉबी देओल सारखा दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. वेब शोमधील एक स्क्रीन शॉट शेअर करत एक नेटकरी म्हणाला, “मनी हाइस्टमध्ये विराट कोहली कॅमिओ करत आहेत.”
Seems like Bobby Deol n Viral Koli had shared beds pic.twitter.com/QbMKu4PmMe
— Sʜɪᴠᴀɴɢ (@shiv_shri0123) September 4, 2021
तर काही फॅन्स म्हणाले, “हा विराट कोहली आणि बॉबी देओलचा मुलगा आहे.”
From robbing a gold from train to helping government to arrest professor , lord Bobby comes a long way #MoneyHeist #BobbyDeol pic.twitter.com/hX6FROY0U2
— (@Mahiyank78) September 3, 2021
आणखी एक नेटकरी म्हणाला, “मनी हाइस्टमध्ये विराट कोहली आहे आणि कुणी नोटीसदेखील केलं नाही.”
Virat Kohli was in Money heist and no one noticed?! pic.twitter.com/ynRcXwgi5a
— kayy (@cartikayyy) September 4, 2021
‘मनी हाइस्ट’च्या यापूर्वीच्या चार सिझनला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर या शोचा पाचवा सिझन रिलीज करण्यात आला आहे. असं असलं तरी हा सिझन दोन भागात पाहायला मिळणार आहे. तीन सप्टेंबरला या सिझनचे पाच भाग रिलिज झाले आहेत. तर उर्वरित भाग डिसेंबर महिन्यात रिलीज करण्यात येणार आहेत.