सध्याचा काळ हा वेब सीरिजचा असल्याचं म्हटलं जातं. चित्रपट, मालिका किंवा नाटक पाहण्यापेक्षा प्रेक्षकांचा कल वेब सीरिजकडे जास्त आहे. तसंच या वेब सीरिजसाठी सध्या अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सध्या तरुणाईमध्ये वेब सीरिजची तुफान क्रेझ असल्याचं दिसून येतं. त्यातच अनेक वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन आणि शिवराळ भाषेचा प्रचंड भरणा असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर गाजत असलेल्या अशा कोणत्या सीरिज आहेत ते जाणून घेऊ.
काही सीरिज कोणत्या ते पाहुयात.
१. ट्रिपल एक्स (XXX) –
सर्वात जास्त बोल्ड सीन या सीरिजमध्ये असल्याचं म्हटलं जातं. या सीरिजची कथा सेक्स, महिला आणि अन्य काही वादग्रस्त घटनांभोवती फिरताना दिसते. या सीरिजमध्ये शंतून माहेश्वरी, रित्विक धंजानी, अंकित गेरा यासारखे लोकप्रिय कलाकार झळकले आहेत.
२. लस्ट स्टोरीज –
सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज म्हणून लस्ट स्टोरीज या सीरिजकडे पाहिलं जातं. करण जोहर, झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजमधील अभिनेत्री कियारा अडवाणीचा मास्टरबेशन करतानाचा एक सीन प्रचंड चर्चेत आला होता.
३. मिर्झापूर –
गुन्हेगारी जगतावर आधारित ही सीरिज आहे. मात्र यातदेखील अनेक बोल्ड सीनचा भरणा करण्यात आला आहे. अमेझॉन प्राइमवरील ही सीरिज विशेष लोकप्रिय असून त्याचा पुढील भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, विक्रांत मेस्सी, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.
४. माया २ –
दोन समलैंगिक महिलांच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये लीना जुमानी आणि प्रियल गौर या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या आहेत. या दोघींमधील किसिंग सीन हा तुफान व्हायरल झाला होता.
५. अपहरण –
क्राइम आणि बोल्डनेसचा भरणा असलेल्या या सीरिजची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून माही गिलचा बोल्ड अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आला आहे.
६. सेक्रेड गेम्स-
प्रचंड गाजलेली सीरिज म्हणजे सेक्रेड गेम्स. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकला आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री राजश्री यांचे अनेक बोल्ड सीन दाखविण्यात आले आहेत. तसंच ही सीरिज न्युडिटी आणि बोल्ड कंटेटमुळे चर्चेत आली होती. यात नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खानदेखील मुख्य भूमिकेत झळकला आहे.
७. गंदी बात-
गंदी बात या सीरिजची निर्मिती एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीने केली आहे. समाजात घडणाऱ्या काही गोष्टींवर अनेकदा कोणी व्यक्त होत नाही अशाच मुद्द्यांवर ही सीरिज आधारित आहे. मात्र या सीरिजमध्ये प्रचंड बोल्ड सीनचा भरणा आहे.