नेहमी वादाच्या भोव-यात असणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा वादंगात सापडली आहे. पूनमची बोल्ड छायाचित्रे असलेल्या ‘नशा’ चित्रपटाचे पोस्टर्स माहिम परिसरातील स्थानिकांनी जाळले.
मुंबईतील ‘नशा’ चित्रपटाचे बोल्ड पोस्टर्स पाहून शनिवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी पोस्टर्स फाडून जाळून टाकले. तसेच, दिल्लीतील सीमापूरी भागातील नागरिकांनीही चित्रपटाचे पोस्टर्स जाळले आणि काही पोस्टर्स पोलीस ठाण्यात नेऊन त्याबाबत तक्रार दाखल केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनांबाबत कळताच पूनमला धक्का बसला. पूनम म्हणाली की, चित्रपटाचे पोस्टर्स पाहून लोकांचे मन दुखावले असेल तर याबाबत त्यांची माफी मागण्यास मी तयार आहे.
पूनम पांडे ‘नशा’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटानंतर आपले नावसुद्धा रेखा, काजोल, माधुरी दीक्षित यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्रींसोबत घेतले जाण्याची आशा पूनमला आहे. पूनम म्हणाली की, चित्रपटातील काही प्रणयदृश्य सोडता प्रेक्षकांना आवडेल असे खूप काही आहे. माझ्यात असलेल्या अभिनयाची कला दाखविण्यासाठी मी हा चित्रपट निवडला. चित्रपटामध्ये बोल्ड लूक देण्यासाठी असे पोशाख परिधान करुन मी समाजिक कार्य करत असल्याचे मला वाटते आणि त्यातून प्रेक्षकांना आनंदही मिळत आहे. प्रेक्षकांना मला अशा भूमिकेत आणि कपडयांमध्ये पहायला आवडते.
वादाच्या भोव-यात सापडलेला ‘नशा’ चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होत आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल