बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. अनुराग सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. अनुराग कश्यप कायमच बॉलिवुडविषयी भाष्य करताना दिसून येतो. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं की त्याला सौदी अरेबिया मध्ये अटक करण्यात आली होती.
ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीचे अनुराग कश्यपने दिले आहेत. नुकताच तो Unfiltered with Samdish या कार्यक्रमात आला होता. ज्यात त्याने खासगी आयुष्य, राजकरण, बॉलिवूड अशा विषयांवर भाष्य केले आहे. त्याने अटकेबद्दलदेखील सांगितले आहे. त्याला सर्वात खराब विमान प्रवासाबद्दल विचारले असता तो असं म्हणाला, “मी डेन्मार्कमध्ये अडकलो होतो कारण तिथे ज्वालामुखीच्या राखेमुळे विमानांचे उड्डाण होत नव्हते. त्यामुळे मग मी ट्रेनने रोमला पोहचलो. मी खूप वैतागलो होतो. मी तिकीट काढले ते विमान सौदीला जाणार होते मात्र ते विमान ५ तासांनी सुटणार होते. मग मी तिथल्या लाउंजमध्ये गेलो आणि वाईन पीत बसलो. मी दारूच्या नशेत विमानात बसलो, जेव्हा मी सौदीत उतरलो तेव्हा तिकडच्या अधिकाऱ्यांनी मला अटक केलं कारण मी सौदीमध्ये उतरलो तेव्हा पूर्णपणे नशेत होतो.”
“मला पाकिस्तानात…” राणी मुखर्जीने सांगितला होता परवेज मुशर्रफ यांच्या भेटीमागचा ‘तो’ किस्सा
तो पुढे म्हणाला, “ते माझी चौकशी करू लागले. सुदैवाने माझ्याकडे माझा फोन होता आणि मी रॉनी स्क्रूवाला मेसेज केला. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला चौकशीच्या खोलीत बसवले होते आणि ते बाहेर चर्चा करत होते. माझ्याकडे एक पिशवी होती ज्यात पोर्क सौसेजेस होते. मी ती पिशवी पकडून बसलो होतो. मला पुढचे विमान कुठेच होते हे माहिती नव्हते. नंतर मला समजले पुढचे विमान हे जेट एरवेज कंपनीचे होते. कारण त्याचे पायलट आले आणि ते या अधिकाऱ्यांशी वाद घालू लागले. अखेर तीन तासांनी मला जेट एअरवेजच्या लोकांनी विमानात बसवले आणि मी परतलो.”
अनुरागचा नुकताच ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. करण मेहता, अलाया एफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच विकी कौशलदेखील या चित्रपटात झळकला आहे.