१००-२०० कोटींचा नफा हे २०१३ चे समीकरण पुढे घेऊन बॉलीवूडने या वर्षी वाटचाल सुरू केली खरी..पण, वर्षांच्या सुरुवातीलाच सलमान खान अभिनित ‘बिग बजेट’ चित्रपट ‘जय हो’ला लोकांनी घरचा रस्ता दाखवला. अर्थात, केवळ ‘बीइंग ह्य़ुमन सलमान’ या व्यक्तीभोवतीचं वलय, चाहत्यांचं त्याच्यावरचं अफाट प्रेम यामुळे अगदी परस्परविरोधी परिस्थितीतही या चित्रपटाने तिकीटबारीवर चांगली कमाई करत बॉलीवूडच्या पहिल्या फळीतील ‘खान’दानाची वाट मोकळी करून दिली. मात्र, हा सिलसिला कायम टिकू शकला नाही. सलमान खानची ‘किक्’, शाहरूख खानचा ‘हॅप्पी न्यू इअर’ आणि आमिर खानचा ‘पीके’ अशा मोजून एकेक चित्रपटाला २०० कोटींच्या वर गल्ला मिळवता आला आहे. जोडीला हृतिक रोशनचा ‘बँग बँग’, अजय देवगण-रोहित शेट्टी जोडगोळीचा ‘सिंघम रिटर्न्स’ आणि अक्षय कुमारचा ‘हॉलिडे’ यांनी चांगली कमाई केली असली तरी या चित्रपटांच्या निर्मितीवर केला गेलेला खर्च, प्रसिद्धी आणि वितरणाची मोठमोठी समीकरणे पाहता त्यांचे यश ‘लक्षणीय’ आहे असे म्हणता येणार नाही. म्हणूनच या वर्षी खरी किमया केली आहे ती नायिकाप्रधान चित्रपट आणि अलिया, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूरसारख्या नव्या फळीतील कलाकारांच्या चित्रपटांनी.. प्रेक्षकोंची बदलती अभिरुची आणि दिग्दर्शकांच्या शैलीला आलेले महत्त्व, नव्या कलाकारांचा वाढता भरणा आणि आशयाच्या दृष्टीने झालेले वेगळे प्रयोग पाहता २०१४ हे वर्ष नेमकं कसं होतं.. याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतील चार कलाकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न..

नायिका सुपरहिट!
गेल्या वर्षभरात डझनभर नायिकाप्रधान चित्रपट आले आणि त्यातल्या अध्र्याहून अधिक चित्रपटांनी चांगलं यश मिळवलं. या चित्रपटांच्या निर्मितीचा खर्च मोठय़ा चित्रपटांच्या तुलनेत अगदीच नगण्य होता. मात्र, या चित्रपटांनी अगदी ६० ते ७० कोटींच्या घरात केलेली कमाई ही चित्रपटसृष्टीतही कौतुकाची बाब ठरली आहे. वर्षांच्या सुरुवातीलाच माधुरी दीक्षित आणि हुमा कुरेशी यांचा ‘देढ इश्किया’ प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘हायवे’, ‘क्वीन’, ‘गुलाबी गँग’, ‘बॉबी जासूस’, ‘मर्दानी’, ‘मेरी कोम’, ‘खूबसूरत’ असे दर महिन्याला रांगेने नायिकाप्रधान चित्रपट प्रदर्शित झाले. यात सर्वाधिक यश मिळवलं ते कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या ‘क्वीन’ चित्रपटाने.. विकास बेहल दिग्दर्शित ‘क्वीन’ प्रेक्षकांबरोबरच बॉलीवूडजनांनाही भलताच आवडून गेला!
यशस्वी ठरलेले चित्रपट
मेरी कोम – ६४ कोटी
क्वीन – ६१ कोटी
मर्दानी – ३६ कोटी
हायवे – २७.२५ कोटी
खूबसूरत – २५.८७ कोटी

चित्रपटांची कमाई हे आता यशाचं परिमाणच उरलेलं नाही
मोठे चित्रपट म्हणजे आघाडीच्या कलाकारांचे चित्रपट, बिग बजेट चित्रपट असं एक समीकरण निश्चित झालं आहे. मी समजू शकतो की अशा बिग बजेट चित्रपटांच्या यशाचं परिमाण म्हणून ते १०० कोटी, २०० कोटींची rv04कमाई, देशात-परदेशात झालेली कमाई अशी मोजदाद केली जाते. प्रत्यक्षात प्रेक्षकांना चित्रपटांच्या कमाईशी काहीच देणंघेणं नसतं. त्यांना फक्त चित्रपट आपल्याला आवडतोय की नाही, एवढी एकच गोष्ट महत्त्वाची असते. त्यामुळे चित्रपटांची कमाई हे कलाकारांसाठीही यशाचं परिमाण उरलेलं नाही आहे. ‘मुगल-ए-आझम’सारखा चित्रपट लोकांना आजही आवडतो. त्या काळी त्या चित्रपटाने किती कमाई केली होती, याचा तुम्ही-आम्ही विचार करतो का? या वर्षी तर खूप चांगले चित्रपट आले आहेत. अगदी छोटय़ा चित्रपटांनीही चांगलं यश मिळवलं आहे. आणि आता प्रेक्षकांचा प्रतिसादही थेट असतो. चित्रपट तीन दिवसांत किती कमाई करतो हे आकडे उशिरा येतात. पण, चित्रपट चालणार की नाही हे अगदी पहिला शो बघितल्या बघितल्या लोक ट्विटर नाहीतर व्हॉट्सअपवर टाकून मोकळे होतात. तिथे खुली चर्चा असते. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना आपण किती यशस्वी झालो आहोत हे थेट चाहत्यांक डूनच कळतं.

तीन खान असूनही छोटे चित्रपट चालतातच की..
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष फारच मजेशीर आणि वेगळं ठरलं आहे असं वाटतं. मुळात पहिली गोष्ट मला rv05ठळकपणे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे बॉलीवूडचे तीनही खान फॉर्मात आहेत आणि तरीही त्यांच्या चित्रपटांबरोबरच इतर छोटे, वेगळ्या विषयांवरचे चित्रपट लोकांना आवडलेत. त्यांना आर्थिक यशही मिळवता आलं आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या यशामुळे सर्जनशील दिग्दर्शक आणि कलाकारांना जो आत्मविश्वास मिळाला आहे त्याचं कुठलंही मोजमाप नाही आहे. तरुण दिग्दर्शक-लेखक अगदी वेगळ्या प्रकारच्या कथा घेऊन त्यावर काम करतायेत. त्यामुळे हॉररपटांपासून ते मसाला चित्रपटांपर्यंत अगदी वेगळे चित्रपट या वर्षी लोकांनाही पाहायला मिळालेत आणि कलाकारांनाही आव्हानात्मक भूमिका मिळाल्या आहेत. ‘फिल्मिस्तान’सारखा एक छोटा पण अगदी वेगळ्या विषयावरचा चित्रपट आला. तो महोत्सवातही चर्चिला गेला आणि इतक्या छोटय़ा चित्रपटानेही चांगली कमाई के ली. यामुळे मला वाटतं की वेगळा आशय आणि मांडणी असलेले चित्रपट पुढच्या वर्षी जास्त प्रमाणावर पाहायला मिळतील. मला स्वत:ला ‘बॉबी जासूस’ सारखा अगदी वेगवेगळ्या भूमिका असलेला चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाला यश मिळालं नसलं तरी या वर्षी बहुतांश नायिकाप्रधान चित्रपटांनाही खूप चांगलं यश मिळालं आहे. नायिकाप्रधान चित्रपट चालणं ही आपल्याकडे फार अवघड गोष्ट असते. या वर्षी जवळपास प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्रीने एक तरी मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट केला आहे आणि त्यांनी ‘खान’ चित्रपटांना जसं यश मिळतं तसं यश मिळवून दाखवलं आहे.

तुमच्याकडे चांगली कथा असेल तर तुम्ही काहीही करू शकता
गेल्या वर्षभरात मी स्वत: तीन वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांवर काम केलं आहे. ‘पीके’ व्यावसायिक चौकटीतला सिनेमा असला तरी त्याची कथा पूर्णपणे वेगळी आहे. अशा प्रकारची कथा तुम्ही इतक्या मोठय़ा rv06प्रमाणावर सादर करण्याचे धाडस आता दाखवू शकता कारण, या चित्रपटांना आज प्रेक्षकांकडून मोठी मागणी आहे. ‘हायवे’, ‘क्वीन’सारखे चित्रपट जे आहेत त्यांची कथा ही आजवरच्या मसाला चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. त्यांची मांडणीही तितक्याच वास्तव पद्धतीने केली गेली आहे आणि लोकांनाही हे चित्रपट आवडल्यामुळे त्यांना व्यावसायिक यशही मिळालं आहे. तुमच्याकडे चांगली कथा असेल आणि ती प्रभावीपणे मांडण्याचं कसब तुमच्याक डे असेल तर तुम्हाला यश मिळणारच. या वर्षी ज्या चित्रपटांना यश मिळालं आहे ते पाहिल्यावर आणखी नवे विषय, नवे प्रयोग करण्याचा विश्वास आत्ताच्या चित्रपटकर्मीना मिळाला आहे. मी स्वत: ‘एनएच-१०’ सारखा वेगळा चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री म्हणून करू शकले, कारण कुठेतरी चांगल्या कथांना आर्थिक पाठिंबा, योग्य प्रसिद्धी मिळाली तर ते चालतात. तुमचे चित्रपट लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचले पाहिजेत, हा विश्वास गेल्या वर्षभरात मिळाला आहे. ‘मेरी कोम’सारखा चरित्रपटही लोकांना आवडतो आणि ‘हॅप्पी न्यू इअर’लाही तितकीच गर्दी होते.

प्रत्येक चित्रपटासाठी इथे एक प्रेक्षकवर्ग आहे
एका वर्षांत एवढय़ा मोठय़ा चित्रपटसृष्टीत बदल होतो हे म्हणणं योग्य ठरणार नाही. गेल्या दहा वर्षांत rv07आपल्याकडे वेगवेगळ्या कथांवर प्रयोग केले गेले. कथेची मांडणी असेल, नवीन कलाकारांना तयार करणं असेल हे गेल्या काही वर्षांत जे प्रयत्न के ले गेले त्याचं फलित या वर्षी पाहायला मिळालं असं मी म्हणेन. आत्तापर्यंत एक कलाकार एकाच शैलीतील आणि एकाच बॅनरचे चित्रपट वर्षांनुर्वष करत राहायचा. आता तसं चित्रच राहिलेलं नाही. या वर्षी तर खूप सारे नवीन कलाकार आले. पण, प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. हा जो काही वेगळेपणा आहे तो प्रेक्षकांनाही नक्कीच आवडला असणार. त्यामुळे या वर्षी प्रत्येक चित्रपटासाठी आपली एक जागा आहे, प्रत्येक विषयावरच्या चित्रपटांचा आपला एक प्रेक्षकवर्ग आहे हे सिद्ध झालं आहे.

Story img Loader