एका कलाकाराला नेहमीच हिरो किंवा तरुण माणसाच्या भूमिका साकारायला आवडतं. असे फार कमी कलाकार आहेत जे ऑन स्क्रीनवर वडील किंवा आईची भूमिका साकारायला तयार होतात. या काही कलाकारांच्या यादीत अभिनेता अभय देओलच नाव देखील सामील आहे. अभयने आजवर बऱ्याचं सिनेमात आणि वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ती प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने एका वडिलांची भूमिका साकारण्या बद्दल आपले मत मांडले आहे.
अभय देओल त्याचा आगामी चित्रपटात एका तरुण मुलीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिके बद्दल बोलताना त्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ सांगितले की,”मला वडिलांची भूमिका साकारायला काहीच प्रॉब्लेम नाही. बॉलिवूडमध्ये अजून ही प्रथा आहे की ५० वर्षाचा नट २० वर्षाच्या तरुणीच्या हीरोची भूमिका साकारतो ; प्रेक्षक ते स्वीकारतात. अभय ‘स्पिन’ या त्याच्या आगामी चित्रपटात अवंतिका वंडणपूच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसेल. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
वडिलांच्या भूमिके बद्दल बोलताना अभय पुढे म्हणाला की, “मला माहिती आहे की मी काय करतो आहे…जोवर प्रेक्षकांना पटते तो वर मी ३५ काय आणि ४५ काय कोणत्या पण भूमिका साकारायला तयार आहे.” अभय देओल नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सिनेमा ‘चॉप स्टीक’ यात प्रमुख भूमिका साकारताना दिसला होता. तसेच तो ‘जंगल’ आणि ‘जंक्शन’ या दोन आगामी चित्रपटांत काम करत आहे.