मिसळ पाव हा पदार्थ महाराष्ट्रात चवीपरीने खाल्ला जातो. कोण म्हणतं पुण्याची मिसळ उत्तम, कोण म्हणतं कोल्हापूरची उत्तम असते तर कोण म्हणतं नाशिकची उत्तम असते, प्रत्येक भागातील मिसळ कशी बनते यावर त्याची चव अवलंबून असते. तिथल्या मसाल्यांचा, करणाऱ्या हातांचा गुण असं सगळं त्या मिसळीत उतरलं जात. अशीच एक मिसळ प्रसिद्ध आहे ती म्हणजे ठाणे शहरातील ‘मामलेदार मिसळ’, गेली अनेकवर्ष ही मिसळ तमाम खवय्यांचा घाम फोडत आहे. सामान्य जनतेप्रमाणे सेलिब्रेटी लोकांना या मिसळीची क्रेझ आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनदेखील या मिसळीच्या प्रेमात आहे.
ठाण्यातील राजकरणाप्रमाणे या शहरातील मिसळदेखील प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत या मामलेदार मिसळीबद्दल खुलासा केला होता. अभिषेक बच्चनने आपल्या अभिनयातून आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत . काही महिन्यांपूर्वी तो ‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात आला होता, ज्यात त्याने मुंबईतील खाद्यसंस्कृतीवर भाष्य केले होते. तो असं म्हणाला “माझ्या मते उत्तम मिसळ ही ठाण्यातून येते ती म्हणजे मामलेदार मिसळ,” असा खुलासा त्याने केला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांनीदेखील या झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचा शाही विवाह सोहळा पाहता येणार; ‘या’ ओटीटी प्लँटफॉर्मने दिले संकेत
ठाण्याची मामलेदार मिसळ त्याच्या झणझणीतपणामुळे प्रसिद्ध आहे. या मिसळीला तब्बल दशकांची परंपरा आहे. १९४६ रोजी मुर्डेश्वरून आलेल्या नरसिंह मुर्डेश्वर यांनी ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेरची जागा व्यवसायासाठी शासनाकडून भाडेतत्वावर घेतली तिथे त्यांनी कँटीन सुरू केले, मिसळीसाठी हे कॅन्टीन प्रसिद्ध होते. त्यातूनच या कँटीनला ‘मामलेदार मिसळ’ असे नावही पडले. नरसिंह मुर्डेश्वर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी पुढे ही परंपरा सुरु ठेवली.
दरम्यान अभिषेक बच्चनची काही दिवसांपूर्वी ‘ब्रीद: इनटू द शॅडोज २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. २०२० मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. लवकरच तो आता अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात दिसणार आहे.