बॉलिवूडचं सिंघम अर्थात अजय देवगण, गेली अनेकवर्ष तो मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने मागच्या वर्षी आलेल्या ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटातदेखील काम केलं आहे. मात्र कधीकाळी याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा अजय देवगणला राग आला होता.
‘आरआरआर’ चित्रपटातील गाण्याने ऑस्कर पटकवल्यानंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे नाव आता जगाला माहिती पडले आहे. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आज अनेक कलाकार उत्सुक आहेत. मात्र अजय त्यांच्यावर नाराज होता. २०१२ साली राजमौली यांचा ‘इगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यादरम्यानच अजय देवगणचा ‘बोल बच्चन’ प्रदर्शित झाला होता. अजय देवगणचा हा चित्रपट तुफान चालला मात्र आंध्र प्रदेशमध्ये चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. कारण तेव्हा ‘इगा’ तिकडे चालत होता. त्यामुळे अजय देवगण राजमौलींवर भडकला होता.
“साऊथवाले हा चित्रपट…” ‘घर बंदूक बिरयानी’बद्दल सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य
अभिनेता दिग्दर्शकाच्या जोडीचा प्रसंग खुद्द अजय देवगणने मागे सांगितला होता तो असं म्हणाला, की “बोल बच्चन’नंतर माझा ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट येणार होता पण तेव्हा मला कळले की माझा चित्रपट राजमौली यांच्या ‘मर्यादा रामण्णा’चा रिमेक आहे. पुढे आमची भेट झाली तेव्हा मी त्यांचा ‘इगा’ चित्रपट पहिला आणि मला तो आवडला. मला त्यांचे दिग्दर्शन आवडले. त्यांनी मला या चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठीदेखील विचारले.” ‘मक्खी’ नावाने हा चित्रपट हिंदीत डब करण्यात आला. या चित्रपटाच्या काही भागाचे अजयने डबिंग केले होते
दरम्यान ‘आरआरआर’ चित्रपटात अजय देवगणने छोटीशी भूमिका साकारली होती. अजयबरोबरच या चित्रपटात आलिया भट्टदेखील दिसली होती. रामचरण, ज्युनिअर एनटीआर हे दाक्षिणात्य अभिनेते मुख्य भूमिकेत होते. आता अजय देवगण त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.