बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. दमदार अभिनय आणि खिलाडी वृत्तीच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याचा चाहता वर्गही फार मोठा आहे. तो सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतो. सध्या तो एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनसाठी या चित्रपटाची टीम पुण्यात गेली होती. तिथे अक्षयने मिसळ पावचा आस्वाद घेतला. पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे रक्षाबंधनच्या संपूर्ण टीमने मिसळ पाववर ताव मारला. त्याचा मिसळ पाव खातानाचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. इतरांप्रमाणेच झणझणीत मिसळ खाण्याचा मोह अक्षयलाही आवरता आला नाही, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अक्षयचा मिसळ पाववर ताव मारतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पुण्यात मिसळ पावचा आस्वाद घेतल्यानंतर अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘रक्षाबंधन’ टीमचा मिसळ पाव खातानाचा फोटो त्याने शेअर केला आहे. ‘प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळपाव! हृद्यानंतर आता आमचे पोटही पूर्णपणे भरले आहे. श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे धन्यवाद. खूप छान’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

‘रक्षाबंधन’ चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लो यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर आनंद एल राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट बहिणीसाठी असल्याचं अक्षयने म्हटलं होतं. त्यामुळे हा चित्रपट अक्षयसाठीही खास आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप ठरल्यानंतर या चित्रपटाकडून अक्षयप्रमाणेच त्याच्या चाहत्यांनाही अपेक्षा आहेत.