बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सातत्याने चर्चेत येत असतो. नुकताच त्याचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून तो पहिल्यांदाच इम्रान हाश्मीबरोबर झळकणार आहे. चित्रपटांप्रमाणेच एका मुद्द्यावरून त्याच्यावर बरीच टीका होते तो मुद्दा म्हणजे कॅनडाचे नागरिकत्व, यावरच त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अक्षय कुमार बऱ्याचदा चर्चेत येत असतो. त्याच्यावर टीकादेखील होत असते. मात्र या टीकेमुळे त्याला वाईट वाटते. तो असं म्हणाला, “भारत माझ्यासाठी सर्व काही आहे. मी जे काही कमावले आहे, मी जे काही मिळवले ते येथून आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला परत देण्याची संधी मिळते. कधी कधी वाईट वाटतं जेव्हा लोक नकळत काहीही गोष्टी बोलतात.

Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Allegations against Amit Shah baseless The Ministry of Foreign Affairs informed the High Commission of Canada
‘अमित शहांवरील आरोप निराधार’; परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तालयाला सुनावले
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!

‘हेरा फेरी ३’च्या दिग्दर्शकावर चाहते नाराज; निषेध व्यक्त करत म्हणाले, “याचे आधीचे चित्रपट…”

अभिनेत्याने सांगितले की, ९० च्या दशकात त्याचे चित्रपट चालत नव्हते म्हणून त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. “माझे चित्रपट चालत नव्हते मात्र काम तर करावे लागणार होते. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो कारण माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला, ‘इथे ये’. मी अर्ज केला आणि मी गेलो. मात्र माझे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि नशिबाने ते सुपरहिट ठरले. तेव्हा माझा मित्र म्हणाला “तू परत जा आणि पुन्हा काम सुरु कर.” मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि मला अधिक काम मिळत राहिले.”

तो पुढे म्हणाला, “माझ्याकडे पासपोर्ट होता हे मी विसरलो. मी हा पासपोर्ट बदलला पाहिजे असा मला कधीही विचार नव्हता. परंतु होय, आता मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.