बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला किमान ५ ते ६ चित्रपट करतो. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. मात्र सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. त्यामुळे आता अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला आहे.

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने आगामी चित्रपटांसाठी त्याचे मानधन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका चित्रपटासाठी ७५ कोटींहून अधिक रक्कम घेणारा अक्षय कुमार आता फक्त ९ ते १८ कोटी रुपये घेणार आहे. पण ज्या चित्रपटांची निर्मिती तो करणार नाही, त्या चित्रपटाच्या नफ्यात तो ५० टक्के सहभागी असणार आहे.
आणखी वाचा : अक्षय कुमारने मानले पंकजा मुंडेंचे आभार, म्हणाला “आम्ही…”

javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Bollywood Actress parineeti chopra Life Story
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?
actor gurmeet choudhary diet plan
दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
director Anurag Kashyap leave Mumbai financial pressures
विश्लेषण : प्रयोगशील दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? त्याचे ‘दाक्षिणायन’ बॉलिवुडला जागे करणार का?
sonu sood denied salman khan for dabang 2
सलमान खानने सोनू सूदला दिली होती ‘दबंग २’ची ऑफर, अभिनेत्याने ‘या’ कारणामुळे नाकारला होता चित्रपट; म्हणाला…

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी घेतली होती. “जर चित्रपट चालला नाही तर त्याची जबाबदारी मी घ्यायला हवी आणि मी ती घेतोय. मी करत असलेल्या काही गोष्टी बदलेन आणि मी कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला हवे, यावरही लक्ष केंद्रित करेन. मी कोणत्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स निवडल्या पाहिजेत? जेणेकरून माझ्या प्रेक्षकांना त्या आवडतील आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करु शकेल. कारण मला असं वाटतं की मी जर एखादा चित्रपट करत असेन, ज्यामध्ये मी मुख्य भूमिका साकारत असेन तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येते”, असं अक्षय कुमार म्हणाला होता.

यानंतर आता अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटांसदर्भात मानधन कमी करुन मोठा निर्णय घेतला आहे. सातत्याने फ्लॉप होणारे चित्रपट, निर्मात्यांची होणारी अडचण या सर्व गोष्टींमुळे अक्षयने याबाबतचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. यामुळे आता अक्षय फक्त ९ ते १० कोटी मानधन आकारणार आहे. यापूर्वी अक्षय हा एखाद्या चित्रपटासाठी ७० ते ७५ कोटी रुपये आकारत होता. त्याच्या या निर्णयानंतर त्याने अभिनेता आमिर खानची पद्धत अवलंबली आहे, असे म्हटले जात आहे. आमिर खान हा चित्रपटांसाठी कमी मानधन वापरतो. पण त्या चित्रपटाच्या कमाईत तो भागीदारी करतो. यामुळेच आमिरने दिल चाहता है आणि धूम ३ या चित्रपटातून चांगली कमाई केली होती.

आणखी वाचा : “तीन महिन्यात नवीन चित्रपट…” ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर निलेश साबळेने उडवली अक्षय कुमारची खिल्ली

यापूर्वी अक्षय कुमारनेही पॅडमॅन या चित्रपटात अशाप्रकारची युक्ती वापरली होती. हा चित्रपट फार कमी बजेटचा होता. या चित्रपटाने ६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचा अक्षयला फायदा झाला होता. यासाठी त्याने फार कमी मानधन घेतले होते.

दरम्यान अक्षय कुमारने चित्रपट फ्लॉपची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि फी कमी केल्यानंतर आता निर्मात्यांच्या नजरा इतर कलाकारांवर लागल्या आहेत. अनेक निर्मात्यांनी त्यांची फी कमी करावी, अशी मागणी केली आहे. अनेक कलाकारांची फी इतकी जास्त आहे की ५० ते ६० टक्के रक्कम यातच जाते. त्यामुळे चित्रपटांचे बजेटही खूप वाढते. त्यामुळे अनेकजण आता कलाकारांनी मानधन कमी करावे, अशी मागणी करु लागले आहे.

Story img Loader