बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचं दिल्लीतील वडिलोपार्जित घर विकल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या गुलमोहर पार्क परिसरामध्ये असलेला ‘सोपान’ हा बंगला त्यांनी विकला आहे. अमिताभ बच्चन यांचे आई-वडील हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन दिल्लीमध्ये याच घरात अनेक वर्ष वास्तव्यास होते. अमिताभ बच्चन यांनी आपला कॉलेज जीवनातील काळ देखील याच घरात घालवला होता. हे घर अमिताभ बच्चन यांनी विकलं असून या घराचा सौदा तब्बल २३ कोटींना झाल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सनं दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत अमिताभ बच्चन यांनी किरोरीमाल कॉलेजमधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. यावेळी अमिताभ बच्चन याच घरात वास्तव्यास होते. त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतर करण्यापूर्वी याच घरात राहात होतं. नेझिऑन ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ अवनी बडेर यांनी ‘सोपान’ बंगला विकत घेतला असून त्या ३५ वर्षांपासून बच्चन कुटुंबीयांच्या परिचित आहेत. या घराचं एकूण क्षेत्रफश ४१८.०५ चौरस मीटर इतकं आहे. ७ डिसेंबर २०२१ रोजी घराचा व्यवहार पूर्ण झाला आहे.

मुंबईतील ड्युप्लेक्स फ्लॅटचं १० लाख प्रतिमहिना भाडं!

अमिताभ बच्चन यांनी नुकतंच मुंबईतील त्यांचं एक घर भाड्याने दिलं आहे. लोखंडवाला रोडवरील अटलांटिस बिल्डिंगमधील ड्युप्लेक्स फ्लॅट त्यांनी अभिनेत्री क्रिती सनॉन हिला तब्बल १० लाख रुपये महिना भाड्याने दोन वर्षांसाठी दिला आहे.

अमिताभ बच्चन हे त्यांच्या कुटुंबासोबत सध्या जुहूमधील जलसा बंगल्यामध्ये राहात आहेत. त्यांनी हा बंगला निर्माते एन. सी. सिप्पी यांच्याकडून खरेदी केला होता. जुहू मॅरियॉटजवळ हा १० हजार १२५ चौरस फुटांच्या जागेत बंगला आहे. जुहूमध्येच अमिताभ बच्चन यांचा अजून एक प्रतीक्षा हा बंगला आहे. १९७६मध्ये त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा विवाह याच बंगल्यात पार पडला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor amitabh bachchan sold off delhi house sopaan for 23 crore pmw
Show comments