बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अनुपम यांच्या अभिनयाची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या सगळ्यासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतील आहे. मात्र अजूनही अनुपम हे भाड्याने घेतलेल्या घरात राहतात. वाटलं ना आश्चर्य पण हे खरं आहे.

अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की ते ज्या घरात राहतात ते भाड्याचे घर असल्याचा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आतापर्यंत  एकाच घर विकत घेतले आहे जे सिमलामध्ये आहे ते त्यांच्या आई साठी. ‘हिंदुस्थान टाइम्स’ ने दिलेल्या वृता नुसार, अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मुंबईत माझं एक सुद्धा घर नाही…मी इथे भाड्याने घेतलेल्या घरात राहतो. चार-पाच वर्षापूर्वीच मी ठरवलं की मी कुठेच प्रॉपर्टी घेणार नाही फक्त शिमलामध्ये माझ्या आईसाठी एक घर घेईन .”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम हे त्यांच्या आईची खूप काळजी घेतात. त्यांची आई शिमलामध्ये अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होती म्हणून त्यांना आईला काहीतर खास भेट द्याची होती. त्यासाठी अनुपम यांनी आई साठी शिमलामध्ये घर घेऊन स्वतः भाड्याने घेतलेल्या घरात राहतात. मुलाने घर घेतलं हे पाहून आई दुलारी यांची रिएॅक्शन सांगताना अनुपम म्हणले, ” आई घर बघून आई मला ओरडली ती म्हणली तुझं डोकं फिरलं आहे का, मला एवढ मोठं घर नको.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायच झालं तर ते लवकरच ‘शिव शास्त्री बड़बोला’ या चित्रपटात नीना गुप्ता यांच्या सोबत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. नुकतच या चित्रपटाचे शूटिंग संपले असून हा त्यांचा ५९१ वा चित्रपट असणार आहे.

Story img Loader