बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘स्पेशल २६’, ‘हम आपके है कोन’ या सुपरहिट चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. दमदार अभिनयाने अनुपम खेर यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आपल्या राजकीय मतांवर देखील ते ठाम असतात.सध्या ते इमरजन्सी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.
अनेक मुलाखतींमध्ये ते आपली मते परखडपणे मांडत असतात. आजवर त्यांनी ५०० च्यावर चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र एका असा चित्रपट होता ज्यामध्ये सुरवातीला ती भूमिका त्यांना विचारण्यात आली होती. मात्र नंतर दिग्दर्शकाने ती भूमिका अमरीश पुरी यांना दिली. ती भूमिका म्हणजे ‘मोगॅम्बो’ तो चित्रपट होता ‘मिस्टर इंडिया’. चित्रपट यशस्वी ठरला त्यापेक्षा अमरीश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची भूमिका विशेष गाजली.
अनुपम खेर यांनी अप्रत्यक्षरित्या उडवली आमिरची खिल्ली, म्हणाले “हे आहेत २ सर्वात मोठे सुपरस्टार”
याच भूमिकेबद्दल अनुपम खेर यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितले की, ‘या भूमिकेसाठी आधी मला विचारण्यात आलं होतं, मात्र शेखर कपूर यांनी अमरीश पुरी यांना ही भूमिका दिली. हुशार दिग्दर्शकाने माझ्या ऐवजी अमरीश पुरी यांना ती भूमिका दिली हे बरेच झाले, कारण मी ती भूमिका करूच शकलो नसतो. पण यापुढे जर मला अशी भूमिका कोणी विचारली तर ते माझ्यासाठी एक आव्हान असेल’.
अनुपम खेर यांनी देखील अनेक नकारात्मक भूमिका उत्तमरीत्या वठवल्या आहेत. मिस्टर इंडिया भारतातील पहिलावहिला सायफाय चित्रपट होता. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या कारकिर्दीतला हा दुसराच चित्रपट होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. ‘काटे नही कटते’ हे गाणे तेव्हा हिट झाले होते. अमरीश पुरी यांना मोगॅम्बो या भूमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाला होता.