गेल्या वर्षी सिनेमाघरं बंद होण्यापासून ते शूटिंग सुरू करण्यापर्यंत बॉलीवूड सतत चर्चेत राहिले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये ‘नेपोटीझम’च्या वादाने जोर पकडला. वादात बऱ्याच स्टार किड्सची नावे समोर आली आणि या वादाचे रूपांतर ऑनलाईन ट्रोलिंग मध्ये झाले. या सगळ्यात अभिनेता आणि निर्माता अरबाज खान पण ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडला होता.
नुकत्याच एका मुलाखतीत अरबाज याने ऑनलाईन ट्रोलिंगचा प्रभाव आणि त्यातून होणारे मानसिक नुकसान याबद्दल त्याची मते व्यक्त केली. “असे बरेच सेलीब्रिटीज आहेत ज्यांना या ऑनलाइन ट्रोलिंगमुळे त्यांचे फक्त प्रोफेशनल नाही तर मानसिक नुकसान देखील झाले आहे” असे त्याने त्या मुलाखतीत सांगितले.
अरबाज पुढे सांगतो “गेल्या वर्षभरात जे काही झालं ते त्रासदायकच होतं. ऑनलाइन ट्रोलिंग जणू काही एक ट्रेंड सारख, एका लाटेसारखे असते ते अंगावर येतात आणि त्यावेळी मानसिक रित्या खंबीर राहणे महत्वाचे असते. त्यांनी (ट्रोलर्सनी ) बऱ्याच जणांच्या आयुष्याची वाट लावली आहे. ज्या लोकांनी या ट्रॉलेर्सचा सामना केला ते तरले तर बाकीच्यांचे नुकसान झाले .” असे त्याने त्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले. पुढे ट्रोलर्स बद्दल बोलताना अरबाज म्हणाला, “या ट्रोलर्समुळे बऱ्याच सेलीब्रिटीजचे मानसिक आणि व्यावसायिक नुकसान झाले असून जरी न्याय मिळाला तरी या लोकांना मीडियासमोर ट्रायल द्यावी लागतेच .”
नंतर सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये नाकोटिक्सने दखल घेतली . त्यानंतर बरेच वाहिन्या बॉलीवूड हे एक ‘ड्रग हब’ आहे अश्या बातम्या देत होते. त्यानंतर शाहरुख खानच्या रेडी चिलीस् एंटरटेंमेन्ट, सलमान खान, आमिर आणि अरबाज खानसह बॉलिवूडमधील ३४ बड्या निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकशी संपर्क साधत काही बेकायदेशीर वृत्त वाहिन्यांकडून केल्या जाणाऱ्या बेजबाबदार, अपमानास्पद आणि बदनामीकारक टीकेवर मर्यादा याव्यात यासाठी मागणी केली होती.
अरबाज म्हणतो ऑनलाइन ट्रोलिंग कधीच ऑर्गनिक नव्हते, बॉलीवूड सेलीब्रिटीजना खाली आण्यासाठी ते मुद्दाम केले जात. पुढे तो म्हणतो “आत्तापर्यंत फक्त दोन व्यवसाय होते ज्यांना मान दिला जात होता – क्रिकेट आणि अभिनय. आतापर्यंत क्रिकेटर्स आणि कलाकार सुरक्षित होते. क्रिकेटर अजूनही तो आनंद घेत आहेत. मात्र आता कलाकारांना तो मान राहिला नाही. हे असे आहे की, ‘अरे तुम्हाला वाटते की तुम्ही सरकारविरूद्ध बोलू शकता, आम्ही तुम्हाला दाखवू की तुमचे कलाकारसुद्धा संत नाहीत आणि आम्ही त्यांची बदनामी करू.’ ही मोहीम आहे. आणि म्हणूनच ते आमच्यावर आरोप करतात. अरबाज सांगतो हे आरोप एवढे असतात की त्याचे नातेवाईक त्याला फोन करून विचारतात की त्याच्या बद्दलची अफवा खरी आहे का खोटी. अरबाज सांगतो की “हे लोक खरं खोटं माहीत नसताना सरळ ट्रोल करतात आणि आपण जर यात लक्ष दिले नाही तर नंतर त्या गोष्टीचे गांभीर्य कळते.