मद्यपी वाहनचालकांच्या तपासणीवरून अभिनेता आर्यन वैद आणि वाहतूक पोलिसांचा रविवारी वाद रंगला. या वादानंतर दोघांनी जुहू पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी अदखलपात्र तक्रारी दाखल केल्या आहेत.
पूर्वाश्रमीचा मॉडेल आणि अभिनेता आर्यन रविवारी रात्री आपल्या घरी जात होता. जुहू येथे मद्यपी वाहनचालकांची तपासणी मोहीम सुरू होती. पोलिसांनी त्याचे वाहन तपासणीसाठी अडवले. त्यालाही ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’द्वारे तपासणी करण्यास सांगितले. मात्र त्याने हे उपकरण अस्वच्छ असल्याचे कारण देत तपासणीसाठी नकार दिला.
अभिनेता असला तरी त्याला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे तपासणी करावी लागेल, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यावरून पोलीस आणि वैद यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान शिविगाळ करण्यात झाले. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.
जुहू पोलिसांनी आर्यन वैदविरोधात अदखलपात्र तक्रार दाखल केली. तर आर्यनेही वाहतूक पोलिसांविरोधात अदखलपात्र तक्रार दिली. मात्र वैद याने मद्यपान केले नसल्याचे नंतर केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले.

Story img Loader