देशभरात १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याच्या आगामी चित्रपटाचा शेअर केला आहे. डॉक्टर जी असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात आयुष्मान हा मुख्य भूमिका साकारत आहे. आयुष्मान खुराना आणि जंगली पिक्चर्सने इन्टाग्रामद्वारे त्याच्या चित्रपटाचा नवा लूक प्रदर्शित केला आहे.
आयुष्मान खुरानाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आयुष्मान हा डॉक्टरच्या वेशात पाहायला मिळत आहे. ही पोस्ट शेअर करताना तो म्हणाला, “जी म्हणजे गायनेकोलॉजिस्ट, जी म्हणजे गुप्ता…, हे आहे आपले डॉक्टर जी. डॉक्टर उदय गुप्ता उर्फ डॉक्टर जी. त्यांच्या संपूर्ण टीमकडून सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा.” ही पोस्ट शेअर करताना त्याने या चित्रपटातील इतर कलाकारांनाही टॅग केले आहे.
आरजे ते प्रसिद्ध अभिनेता, आयुष्यमान खुरानाबद्दल ‘या’ गोष्टी माहितेय का?
या चित्रपटात आयुष्मानसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर उदय गुप्ता या डॉक्टरच्या भूमिकेत स्वत: आयुष्मान झळकताना दिसणार आहे. डॉक्टर जी हा चित्रपट बॉलिवूड ड्रामा आहे. याद्वारे पहिल्यांदाच रकुलप्रीत आणि आयुष्मान स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करत आहे. तर जंगली पिक्चर्सद्वारे त्याची निर्मिती केली जात आहे.
‘या’ गाण्यामुळे ताहिरा झाली होती इम्प्रेस, जाणून घ्या आयुष्मान-ताहिराची रोमँटिक लव्हस्टोरी
आयुष्मान आणि रकुल व्यतिरिक्त या चित्रपटात शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान हा शेवटचा अनुभव सिन्हा यांच्या ‘अनेक’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो अॅक्शन हिरो या चित्रपटातही दिसणार आहे.