बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा सतत त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखला जातो. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून आयुष्मानने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आता पुन्हा आयुष्मान असाच एक वेगळा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतंच त्याने याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीती दिली आहे.

येत्या १४ ऑक्टोबरला आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मानने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही खुशखबर त्याची चाहत्यांना दिली आहे. सुरुवातीला हा चित्रपट याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण नंतर याची तारीख बदलण्यात आली. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.

History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
Richa Chadha
मुलाला योग्यप्रकारे वाढविण्याची जबाबदारी स्त्रियांची का असते? रिचा चड्ढा गिझेल पेलिकॉटचे उदाहरण देत म्हणाली…
Loksatta natyarang The story of the gradual fading of memory of dementia sufferers
नाट्यरंग: असेन मी नसेन मी: स्मृतिभ्रंशग्रस्तांची हळूहळू विझण्याची कहाणी…
Elderly man beaten by youth Netizens
‘त्यावेळी तुमचा बाप नाही आठवला का रे?’ तरुणांनी केली वृद्ध व्यक्तीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी भडकले
Attack on doctor at Miraj, Miraj hospital,
सांगली : मिरजेत डॉक्टरवर हल्ला, रुग्णालयाची मोडतोड; घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

चित्रपटाच्या नावावरूनच हा एक विनोदी पद्धतीने समाजातील गोष्टींवर भाष्य करणारा चित्रपट असेल असा अंदाज लावता येऊ शकतो. आयुष्मान या चित्रपटात स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शहा यासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आणखी वाचा : जेव्हा अभिनेत्री इशा कोपिकर स्वतःची तुलना थेट बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीं यांच्याशी करते

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभूति कश्यप करणार आहे. अनुभूति ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची बहीण असून हा तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. याआधी तिने काही शॉर्ट फिल्म्स आणि ‘अफसोस’ ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्मान आणि रकुल हे दोघे प्रथमच एकत्र दिसणार आहेत. याबरोबरच आयुष्मानच्या आगामी ‘अॅक्शन हीरो’ या चित्रपटाचीदेखील सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader