गुन्हेगारी जगातून राजकारणात आलेल्या अतिक आणि अशरफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातल्या तिन्ही शूटर्सना पोलिसांनी अटक केली. पोलील या दोन्ही भावांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात होते. तेव्हा पोलिसांच्या समोरच तीन मारेकऱ्यांनी अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडल्या. दरम्यान, हत्याकांडावर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी या हत्यांचं समर्थन केलं आहे, तर काहींनी या हत्याकांडाचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, एका बॉलिवूड अभिनेत्याने या हत्येनंतर केलेलं ट्वीट चर्चेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने ट्विटरवरून त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परंतु त्या प्रतिक्रियेनंतर तो ट्रोल होऊ लागला. त्यामुळे त्याने याप्रकरणी आणखी एक ट्वीट करून सांगितलं की, तो अतिक अहमदचं समर्थन करत नाही. अतिकच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी कमालने ट्वीट केलं होतं की, अतिकने न्यायलयाला सांगितलं होतं, उत्तर प्रदेशमध्ये त्याची हत्या केली जाऊ शकते. उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला अतिकला सुरक्षा प्रदान करण्याबाबत आश्वस्त केलं होतं. आता या हत्येनंतर सर्वोच्च न्यायालय काय पावलं उचलतं हे पाहावं लागेल. सर्वोच्च न्यायालय आता स्वतःचं महत्त्व कसं कायम राखेल?

कमालच्या या ट्वीटनंतर तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. तर काहींनी त्याला अतिकचा समर्थक म्हटलं. त्यानंतर कमालने आणखी एक ट्वीट करून स्पष्ट केलं की, तो अतिक आणि त्याच्या भावाचं समर्थन करत नाही.

हे ही वाचा >> अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला ‘शहीद’ असा उल्लेख

दरम्यान, कमालने आता आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारला विनंती करतो की, अतिकने ज्या ज्या लोकांची संपत्ती बळकावली आहे ती, अतिकच्या कुटुंबाकडून परत घ्या आणि संबंधित लोकांना देऊन टाका.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kamaal r khan tweet on atiq ahmed snatched propoerty yogi adityanath asc
Show comments