मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे अनेक सेलिब्रिटींसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. यावर्षी राज्य सरकारने सर्व करोना निर्बंध मागे घेतल्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. लालबाग नगरी गणरायाच्या आगमनाने सजली आहे. तसेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता सेलिब्रिटी हजेरी लावतना दिसत आहेत.

आणखी वाचा – यंदाच्या गणेशोत्सवात ‘पुष्पा’च्या अवतारात दिसणार बाप्पा, फोटो झाले व्हायरल

अभिनेता कार्तिक आर्यन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. याचदरम्यानचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. बी-टाऊनमधील इतरही सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. कोव्हिड काळात मात्र यामध्ये खंड पडला होता. आता यावर्षी पुन्हा एकदा नवा जल्लोष आणि भाविक, सेलिब्रिटी दर्शनासाठी येत आहेत.

कार्तिक लालबागच्या राजाच्या मंडपात येताच बघ्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला होता. आपल्या लाडक्या बाप्पाचं रुप पाहिल्यानंतर कार्तिकच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं.

आणखी वाचा – Video : “तेथील कलाकार आणि भाषा म्हणजे…” विदर्भातील कलाकारांबाबत समीर चौगुले स्पष्टच बोलले

आज गणेश चतुर्थीच्या निमित्त जगभरात गणरायाच्या भक्तांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. पुढील दहा दिवस मुंबापुरीत आणि विशेषतः लालबागमध्ये गणेशभक्तांची तुफान रेलचेल पाहायला मिळते. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, हे व अशा अनेक मंडळाचे बाप्पा पाहण्यासाठी या दिवसांमध्ये लालबागमध्ये लाखो भाविकांची गर्दी होते. गणरायाच्या आगमनाने सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Story img Loader