अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाला मिळालेलं यश एण्जॉय करत आहे. सगळं काही सकारात्मक घडत असताना कार्तिकला पुन्हा एकदा करोनाने घेरलं आहे. कार्तिकला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिकने देशभर दौरा केला. पण आता मात्र त्याला काही दिवस तरी घरीच थांबावं लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्राजक्ता माळीला मिळाला निवांत वेळ, म्हणाली, “माझी काळजी नसावी लवकरच…”

आपल्याला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली असल्याचं कार्तिकने स्वतः सांगितलं आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वतःचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “सगळं काही सकारात्मक सुरु असताना कोविडलाही थांबावसं वाटलं नाही.” आपल्याला करोना झाल्याचं सांगत असताना हसण्याचं इमोजी त्याच्या पोस्टमध्ये असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – जबरदस्त प्रमोशन, देवदर्शन करुनही ‘सम्राट पृथ्वीराज’ला थंड प्रतिसाद, अक्षय कुमारच्या हाती निराशा

कार्तिकची ही पोस्ट पाहताच त्याचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत. तू लवकर बरा हो, काळजी घे असा सल्ला नेटकरी कार्तिकला देत आहेत. गेल्याचवर्षी मार्च महिन्यात कार्तिकला करोनाची लागण झाली होती. यावेळी त्याने योग्य ते औषधोपचार देखील केले. करोनामधून पूर्ण झाल्यानंतर त्याने ‘भूल भुलैय्या २’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती.

आणखी वाचा – VIDEO : “भगवान हूँ मैं”, ‘आश्रम ४’मध्ये नवा ट्विस्ट, उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

कार्तिक ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी केली. पुन्हा एकदा आपण एक उत्तम अभिनेता आहोत हे कार्तिकने या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्ध केलं. कार्तिककडे सध्या हिंदी चित्रपटांची रांग आहे. ‘शहजादा’, ‘कॅप्टन इंडिया’, ‘फ्रेडी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी चित्रपटासाठी देखील कार्तिकची निवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kartik aaryan covid positive for second time shares post on instagram kmd