सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेताना अमुक एका सेलिब्रिटीचा मुलगा किंवा मुलगी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज, अशा चर्चा रंगताच अनेकजण त्या सेलिब्रिटी किड्सच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेतात. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख, आमिर आणि सैफच्या मुलांसोबतच आणखी एका सेलिब्रिटी किडचं नाव प्रकाशझोतात येतंय. ते नाव आहे मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलीचं, म्हणजेच दिशानी चक्रवर्तीचं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी किड्सच्या यादीतील एक असणारी दिशानी सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती बऱ्याचदा मिथुन दांसोबतचे फोटोही शेअर करत असते. दिशानीच्या फॉलोअर्सचा आकडा आतापासून वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. दिशानी आणि मिथुन दा यांचं नातं खूप खास आहे. बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने दिशानीला दत्तक घेतलं होतं.


काही वेबसाइट्सवर उपलब्ध माहितीनुसार दिशानी मिथुन चक्रवर्ती यांना कचऱ्याच्या डब्यात मिळाली होती. तिला मिथुन चक्रवर्ती यांनी आपलंसं करत मोठ्या लाडानं मोठं केलं. दिशानी तीन भावांची लाडकी बहिण आहे. न्यूयॉर्कमधील फिल्म अकॅडमीतून तिने अभिनय विषयातील एक कोर्स केला. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चिन्हं असल्याचं म्हटलं जातंय. तेव्हा आता ती नेमकी कोणत्या चित्रपटातून या कलाविश्वात पदार्पण करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

दरम्यान, बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी मुलं दत्तक घेत त्यांचं पालकत्त्वं स्वीकारलं आहे. यामध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन, सलीम खान- हेलन, प्रिती झिंटा, रवीना टंडन, कुणाल कोहली यांच्या नावांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच यात आणखी एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे ‘बेबी डॉल’ सनी लिओनीचं. सनीने लातूरच्या निशाला दत्तक घेत तिची जबाबदारी स्वीकारली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor mithun chakraborty adopted a girl found lying in the garbage bin dishani chakraborty has grown up see photos