बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नसरुद्दिन शाह आपल्या अभिनयाच्या बरोबरीने देशातील सामाजिक, धार्मिक गोष्टींवर भाष्य करत असतात. अगदी बॉलिवूडमधील कलाकारांवरदेखील ते टीका करताना दिसून येतात. एक संवदेनशील अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. नुकतीच त्यांनी ‘कसोटी विवेकाची’ या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

नसरुद्दीन शाह भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले की, “डॉ. नरेंद्र दाभोलकर हे असं एक व्यक्तिमत्व होतं, ज्यांच्या पाऊलखुणा मिटण्याऐवजी आणखी खोलवर रुजतील. जोपर्यंत या जगात थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल, तोपर्यंत त्यांचं काम राहील. माझ्यासारख्या लोकांना अभिमान आहे की नरेंद्र दाभोलकरांसारख्या प्रेरणा देणाऱ्या माणसाच्या युगात माझा जन्म झाला आहे. पानसरे सर, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि असे असंख्य प्राध्यापक, चळवळीतील कार्यकर्ते, बुद्धिजीवी लोक आज तुरुंगात आहेत, ज्यांचा गुन्हा आहे इतकाच आहे की ते कायम सत्य बोलत राहिले,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

इंडस्ट्रीमध्ये लेखक व दिग्दर्शकांना…”; सुभाष घईंच्या ‘त्या’ वक्तव्याला विवेक अग्निहोत्रींनी दिला दुजोरा

कोण होते नरेंद्र दाभोलकर?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर होते. या संस्थेमार्फत त्यांनी खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. मूळचे साताऱ्याचे असणारे नरेंद्र दाभोलकर यांनी आपले वैद्यकीय शिक्षण सांगलीमधून पूर्ण केले. त्यांनी प्रामुख्याने समाजातील अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवला, व्यसनमुक्तीसाठी काम केले आहे. ‘अंधश्रद्धा’ या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत. ते उत्तम कबड्डीपटू होते. पुण्यात २० ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती.

नसरुद्दीन शाह गेली अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह यादेखील अभिनेत्री आहेत. नसरुद्दीन शाह यांनी आपल्या करियरची सुरुवात नाटकांमधून केली. त्यांनी दिल्लीच्या ‘एनएसडी’ या संस्थेतून रीतसर प्रशिक्षण घेऊन अभिनयाचं श्रीगणेशा केला. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Story img Loader