९ फेब्रुवारीला बी टाऊनचा हॅण्डसम हंक अभिनेता नील नितीन मुकेश विवाहबंधनात अडकला. गेल्या काही दिवसांपासून बी टाऊन आणि एकंदर कलाविश्वामध्ये लग्नाचे उत्साही वारे वाहत आहेत. २०१६ मध्येही काही सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या एका नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच २०१७ च्या सुरुवातीला अभिनेता नील नितीन मुकेशच्या नावाचाही समावेश झाला. उदयपूर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये नील आणि रुक्मिणीने एकमेकांना सात जन्म साथ देण्याचे वचन देत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही नील-रुक्मिणीच्या या शाही लग्नाच्याच चर्चा सुरु आहेत. नुकतेच नील-रुक्मिणीने त्यांच्या लग्नानंतर रिसेप्शनचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलीवूडची मांदियाळी पाहायला मिळाली.

बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हे पत्नी जया बच्चन यांच्यासमवेत उपस्थित राहिले होते. अभिनेता जॅकी श्रॉफ, कबीर बेदी, नीतू चंद्रा आणि असरानी यांनी देखील पार्टीला उपस्थिती लावली होती. त्याचसोबत, सुपरस्टार सलमान खाननेही पार्टीला हजेरी लावलेली. पाहुण्यांच्या यादीत अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, रणवीर सिंग, कतरिना कैफ, बिपाशा बसू, पूजा हेगडे यांच्या नावाचाही समावेश होता.
इतकेच नाही तर, या पार्टीची थिम ही युरोपियन होती. त्यामुळे सदर ठिकाणी पांढ-या आणि गुलाबी रंगाच्या कार्नेशन फुलांनी सर्व सजावट करण्यात आली होती. तरुणाईला थिरकण्यासाठी नाइटक्लब होते. तर, नव वर-वधूला पाहुण्यांना भेटता यावे तसेच उपस्थितांची गैरसोय होऊ नये याकरिता बँक्वेट हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती.

rukmini-nnm-759

नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या नील-रुक्मिणीच्या पोशाखाबद्दल बोलायचं झालं तर या वर-वधूने गडद हिरव्या रंगाचे भरजरी पोशाख परिधान केले होते. डिझायनर मानव गंगवानी याने डिझाइन केलेल्या ‘बेगम-ए-जन्नत’ कलेक्शनमधील या पोशाखात हे दोघेही जणू राज घराण्यातील जोडप्याप्रमाणे दिसत होते.

fb3edb6a-251e-4ea9-a988-b0d44d9bf578

amitabh-bachchan-jaya-bachchan

big-b1

pooja-hegde

neil-nitin-mukesh-22

madhur-bhandar-kar-with-wife

subroto-roy

काही दिवसांपूर्वीच नील-रुक्मिणीच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला होता. ‘चाँद सी मेहबूबा हो मेरी कब…’या गाण्याच्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिकच्या सुरेख साथीने या व्हिडिओला अधिकच रंजक बनविण्यात आले होते. या ग्रॅण्ड विवाह सोहळ्यात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, एका राणीप्रमाणे रुक्मिणी लग्नमंडपात पोहोचली होती. त्यावेळी व्हिडिओत तिचा चेहरा पाहण्याजोगा होता. मेहंदी, हळद आणि संगीत समारंभाची जोड देत नील-रुक्मिणीचा हा स्वप्नवत विवाहसोहळा पार पडलेला. या सर्व गोतावळ्यामध्ये वऱ्हाड्यांचा थाटही पाहण्याजोगा होता.