सध्या देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करत आहे. आज हरतालिका असून उद्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. परंतु, अनेक जण आदल्या दिवशीच बाप्पाची मुर्ती आपल्या घरी आणतात. यामध्येच अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे.
नीलने इन्स्टाग्रामवर बाप्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बाप्पा घरी आल्याचा आनंद नीलच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया’, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.
दरम्यान, गणपती बाप्पा येणार असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा देशावर करोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर दरवर्षीप्रमाणे आनंद दिसून येत आहे.