बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. मग ते चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा एखाद्या पार्टीतले फोटो असो, त्यांच्या फोटोंवर नेटकरी कायमच कमेंट करत असतात. कलाकार आपले नवीन फोटो शेअर करतातच मात्र आपल्या बालपणीचे फोटोदेखील शेअर करत असतात. सोशल मीडियावर याची चर्चा होते.
बॉलिवूडमधील कपूर खानदान गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे कुटुंब आहे. त्यांची पत्नी नितु कपूर, मुलगी रिधिमा कपूर आणि चिमुकला आहे तो रणबीर कपूर आहे. या चौकोनी कुटुंबाचा फोटो व्हायरल होत आहे. ऋषी कपूर यांनी १९८० साली नितु सिंग यांच्याबरोबर लग्न केले. ऋषी कपूर आणि नितु सिंग यांची जोडी प्रसिद्ध होती.
“तुम्हीपण बोल्ड आहात…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये हॉट सीन्स देणाऱ्या राजश्री देशपांडेचं वक्तव्य
रणबीर कपूर आज बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. २८ सप्टेंबर १९८२ साली त्याचा जन्मझाला . संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे त्याने ‘ये जवानी दिवानी’, ‘बचना ए हसींनो’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘संजू’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले.
मागच्या वर्षी आलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट सुपरहिट ठरला, मागच्या वर्षी त्याने अभिनेत्री आलिया भट्टबरोबर लग्नगाठदेखील बांधली. नुकतेच दोघांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. रणबीर आता ‘अॅनिमल’ आणि ‘तू झुटी मै मक्कार’ चित्रपटात झळकणार आहे.