बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. लवकरच बाबा होणारा रणबीर त्याचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतरचा त्याच्या पहिल्याच वाढदिवसाचा आनंद बाबा होणार असल्यामुळे द्विगुणित झाला आहे. रणबीर कपूर दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांचा मुलगा आहे. रणबीरने त्याचे वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.
माझ्या वडिलांसारखं बाबा होणं मला आवडणार नसल्याचं रणबीर म्हणाला होता. “मी जेव्हा लग्न करेन आणि माझ्या बाळाचा बाबा होईन तेव्हा माझ्या वडिलांसारखं होणं मला आवडणार नाही. मी सुरुवातीपासूनच माझ्या आईच्या जास्त जवळ राहिलो आहे. माझे वडील दिवसभर शुटिंगमध्ये व्यग्र असायचे. रात्री घरी आल्यावर त्यांना आम्हाला वेळ देणं शक्य व्हायचं नाही. तरीही प्रत्येक वडिलांप्रमाणे ते आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. परंतु, ते कामात सतत व्यग्र असल्यामुळे मी त्यांना फोन करून “तुम्ही कसे आहात?” हेदेखील विचारू शकत नव्हतो. ही गोष्टीचं मला कायम वाईट वाटायचं”, असं वक्तव्य रणबीरने केलं होतं.
हेही वाचा >> “मला रणबीर कपूरला कंडोम…”, दीपिका पदुकोणची ‘ती’ इच्छा ऐकून संतापले होते ऋषी कपूर
“मीदेखील आज चित्रपटांमध्ये काम करत आहे. प्रत्येक वेळी माझे वडील माझ्याबरोबर खंबीरपणे उभे असतात. त्यांच्या चाहत्यांसाठी ते दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. परंतु, ते अंतर्मुखी आहेत. त्यांच्या मनातील गोष्टी ते कधीच कोणाजवळही व्यक्त करत नाहीत”, असंदेखील रणबीर म्हणाला होता. ‘खुल्लम खुल्ला’ या अभिनेते ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रातील रणबीरचं हे वक्तव्य चर्चेत आलं होतं.
हेही वाचा >> केबीसीमध्ये सहभागी झालेल्या शिक्षिकेला अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात, म्हणाले “मुलांच्या शिक्षणासाठी…”
रणबीर कपूरने १४ एप्रिलला बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टशी विवाह केला. लग्नानंतर काही महिन्यातच ते आई-बाबा होणार असल्याची गूडन्यूज त्यांनी चाहत्यांना दिली. कपूर कुटुंबियांप्रमाणेच चाहतेही रणबीर-आलियाच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.