बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर-आलिया पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची समाज माध्यमांमध्येही बरीच चर्चा होताना दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार सुरू आहे.

रणबीरही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे. नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनकरिता संपूर्ण टीम चेन्नईमध्ये दाखल झाली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. रणबीरच्या शेजारी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजमौली आणि लोकप्रिय अभिनेता नागार्जुनही जेवताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत रणबीरचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या

हेही वाचा >> Video : पुण्यात अक्षय कुमारने मिसळ पाववर मारला ताव; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेण्डच्या पार्श्वभूमीवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “कितीही स्टंट केले तरी चित्रपट फ्लॉपच होणार आहे”, असं म्हटलं आहे. रणबीरसह एस.एस.राजामौली आणि नागार्जुनला पाहून एकाने “दाक्षिणात्य सुपरस्टारची ही ताकद आहे”, अशी कमेंट केली आहे. “रणबीर चित्रपट चालणार नाही हे पाहून दाक्षिणात्य सुपरस्टारकडे गेला का?”, असं कमेंट करत नेटकऱ्याने म्हटलं आहे.

हेही पाहा >> Photos : ५० कोटी की शून्य?, ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटासाठी आमिर खानने नेमके किती मानधन घेतले?

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader