अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. रुपेरी पडद्यावर हटके भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. इतकंच नव्हे तर विनोदी चित्रपटामध्ये काम करत रितेशने सिनेरसिकांना खळखळून हसवलं. त्याच्या विनोदी चित्रपटामधील भूमिका प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडल्या. त्याने आतापर्यंत ४ ते ५ सेक्स कॉमेडी चित्रपट केले. अशाप्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत रितेशने आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – VIDEO : झोप अनावर झाली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील वनिता खरातचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान रितेश सेक्स कॉमेडी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत बोलत होता. रितेशने ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘क्या कुल है हम’, ‘क्या सुपर कुल है हम’ सारख्या सेक्स कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं. पण एक अभिनेता म्हणून ज्या भूमिका योग्य वाटल्या त्याच रुपेरी पडद्यावर साकारल्या असं रितेशचं स्पष्ट मत आहे. ही भूमिका करू नको असं रितेशच्या कुटुंबियांनी त्याला कधीच सांगितलं नाही.

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितेश म्हणाला, “मी एकमेव अभिनेता आहे ज्याने ४ ते ५ सेक्स कॉमेडी चित्रपट केले आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. हे चित्रपट पाहून भविष्यात माझी मुलं काय विचार करतील याचा विचार मी कधीच केला नाही. जेव्हा मी हे चित्रपट केले तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कोणत्या चित्रपटामध्ये काम करावं ही माझी पसंती होती. हे कर किंवा हे करू नको असं कधीच माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं नाही. माझ्या आवडीचं काम त्यांनी मला करू दिलं.”

आणखी वाचा – Liger Trailer : अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स अन्…; ‘लाइगर’चा धमाकेदार ट्रेलर, विजय देवरकोंडाने जिंकलं प्रेक्षकांचं मन

पुढे रितेश म्हणाला, “माझ्या मुलांना अजूनही हे समजत नाही की पापाराझी छायाचित्रकार, चाहते माझ्याबरोबर फोटो का काढतात? स्टारडमबाबत त्यांना काहीच माहित नाही. प्रसिद्धी ही तात्पुरता असते. तुम्ही सुप्रसिद्ध आहात असं तुम्हाला वाटतं पण तुमचा हा भ्रम असू शकतो. माझी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांचे मित्र त्यांना सांगतात की तुझे वडील स्टार आहेत. अशावेळी मी मुलांना सांगतो की त्यांना जाऊन सांगा की, माझे वडील माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी रोज कामावर जातात.” रितेश आज बॉलिवूडमधील टॉपचा कलाकार असला तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत.

Story img Loader