काल सगळ्यांकडे गणरायाचे आगमन झाले. २ वर्षं कोणताही उत्सव साजरा करायला न मिळाल्याने यावर्षी गणपतीचं स्वागत अगदी धूमधडाक्यात झालं आहे. मराठी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटी लोकांनीसुद्धा त्यांच्या घरच्या बाप्पाचे फोटो शेअर करत सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यात कसा मागे राहील.
सलमान कित्येक वर्षं त्याच्या घरी गणपती बसवतो हे सगळ्यांना ठाऊक आहे. स्वतःच्या धर्मातील काही कट्टर लोकांचा विरोध असूनसुद्धा त्याला न जुमानता सलमान घरात गणपती बसवतो. मात्र काल सलमानने चक्क त्याची बहीण अर्पिताच्या सासरी जाऊन गणपतीची आरती केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्द सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान अर्पिता आणि तिचा नवरा आयुष शर्मा यांच्या घरी दर्शनाला गेला असताना त्याच्या हातात आरतीचं ताट दिलं गेला. सलमान अत्यंत खुश होऊन भक्तिभावाने गणरायची सेवा करत असल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. अर्पिता, आयुष आणि त्यांचा मुलगा या तिघांनीही गणपतीची आरती केली.
यावर्षी सलमानबरोबर इतरही बॉलिवूडच्या स्टार्सनी अर्पिताच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. रितेश देशमुख आणि जेनीलिया या दांपत्यानेही या घरच्या आरतीमध्ये सहभाग घेतला होता. अभिनेत्री कतरिना कैफ ही अर्पिताच्या फार जवळची आहे त्यामुळे कतरिनाने विकी कौशलबरोबर अर्पिताच्या घरी येऊन गणरायाचं दर्शन घेतलं.
आणखी वाचा : “विनाश हा…” ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर अतुल कुलकर्णींचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
सलमानची गणपतीबद्दल आस्था आपल्याला ठाऊक आहेच. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सलमानचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ‘किसीका भाई किसीकी जान’ या चित्रपटात सलमानबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. तर लवकरच सलमान, कतरिना आई इम्रान हाशमीचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.