बॉलिवूडचा बाबा अर्थात संजय दत्त अभिनयापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्त गेली अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. कधीकाळी ड्रग्सच्या आहारी गेलेला हा अभिनेता आता मात्र स्वतःला कायम फिट ठेवत असतो. नुकताच त्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजय दत्तच्या बॉडीची ९० च्या दशकांपासून तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्याचे बॉडी बिल्डिंगचे अनेक यूटुबरवर आजही उपलब्ध आहेत. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो जबरदस्त वर्कआउट करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीदेखील त्याचे कौतुक करत आहेत. संजय दत्त सध्या ६३ वर्षांचा आहे.
“TRP साठी आता…” सोशल मीडियावरील उलट्या पोस्टमुळे झी मराठी वाहिनी ट्रोल
२०२० साली जेव्हा अभिनेता संजय दत्त त्याच्या ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर शेवंती लिमये यांच्याकडे गेला तेव्हा त्याला स्टेज ४ फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्याने यावेळी घाबरून न जाता या आजाराशी लढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो पूर्णपणे या आजारातून बरा झाला तेव्हा त्याने सांगितले की, कॅन्सरशी लढा चालू असताना तो कोणतंही टेन्शन किंवा काळजी न करता पूर्णपणे शांत होता. उपचारादरम्यान त्याने वर्कआउट सुरु ठेवला होता.
संजय दत्त मागच्यावर्षी आलेल्या ‘शमशेरा’ चित्रपटात झळकला होता मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर तो ‘केजीएफ २’ या सुपरहिट चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याचा विशेष लूक लोकांच्या लक्षात राहिला आहे. आता तो ‘हेरा फेरी ४’ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे असे बोलले जात आहे.