बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपुरची पत्नी मिरा राजपुत अभिनय क्षेत्रा पासून लांब असली तरी ती सतत चर्चेत असते. मीरा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्रामवर सक्रिय वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मीराने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच त्याला भन्नाट कॅप्शन देखील तिने दिले आहे.

मीरा राजपूतने नुकताच तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला असून त्यावेळेस शेअर केलेले फोटो चांगलेच चर्चेत होते. आता तिचा कॉफी पितानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या खाली दिलेले कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेदून घेतले आहे. फोटो शेअर करत मीराने कॅप्शन दिलं, “तुम्हाला मला काय म्हणायचे आहे हे माहिती आहे?” या फोटोत मीराने “कॉफी नाहीत तर काहीच बोलणार नाही” असा मेसेज असलेला टी-शर्ट परिधान केल्याचे दिसून येत आहे तसेच गॉगल आणि घट्ट केस बंधून बागेत गरमा-गरम कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे,

मीराच्या या कॅण्डीड फोटोवर नेटकरी फिदा झाल्याचे दिसून येत आहे. तिच्या कमेंट सेक्शनमध्ये या फोटो बाबत असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजरने, “मीरा तू खुप सुंदर दिसत आहेस”, दूसरा युजर म्हणाला “मीरा खुप सुंदर”, “नेहमी प्रमाणेच सुंदर”, असे तिसऱ्या युजरने लिहिले. ७ सप्टेंबरला मीराचा वाढदिवस अगदी सध्या पद्धतीत साजरा केला गेला. तिच्या वाढदिवसादिवशी शाहिदने कपल फोटो शेअर करत एक छान कॅप्शन दिले होते.

Story img Loader